बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय Laal Singh Chaddha; तिसऱ्या दिवशी केली केवळ इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:45 PM2022-08-14T12:45:40+5:302022-08-14T12:46:47+5:30

Laal Singh Chaddha: ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत धिम्या गतीने कमाई करत आहे.

aamir khan film laal singh chaddha box office collection day 3 film registers marginal growth | बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय Laal Singh Chaddha; तिसऱ्या दिवशी केली केवळ इतकी कमाई

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतोय Laal Singh Chaddha; तिसऱ्या दिवशी केली केवळ इतकी कमाई

googlenewsNext

अभिनेता आमिर खान (aamir khan) याची मुख्य भूमिका असलेल्या लाल सिंह चड्ढा (laal singh chaddha) या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांमधून नाराजीचा सूर उमटला. ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत धिम्या गतीने कमाई करत असून तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाची फारशी जादू चालली नाही.

'बॉक्स ऑफिस इंडिया'नुसार, लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची कमाई अत्यंत धिम्या गतीने होत आहे. तिसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाने अत्यंत किरकोळ कमाई केली आहे. शनिवारी या चित्रपटाच्या बिझनेसमध्ये केवळ २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानुसार, शनिवारी या चित्रपटाने केवळ ८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तिसऱ्या दिवशीही चित्रपटाची कमाई किरकोळ

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. परंतु, चित्रपटाचं बजेट पाहता ही कमाई अत्यंत किरकोळ आहे.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने ११.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी केवळ ६.५० ते ७ कोटींच्या आसपास कमाई केली.

दरम्यान, लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खानने स्क्रीन शेअर केली आहे. तसंच मोना सिंहदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.
 

Web Title: aamir khan film laal singh chaddha box office collection day 3 film registers marginal growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.