Laal Singh Chaddha ला OTTवर रिलीज करण्यास आमिर खान तयार, सिनेमा फ्लॉप होण्याची सतावतेय भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:29 IST2022-08-04T15:26:10+5:302022-08-04T15:29:36+5:30
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Laal Singh Chaddha ला OTTवर रिलीज करण्यास आमिर खान तयार, सिनेमा फ्लॉप होण्याची सतावतेय भीती?
आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होतोय. पण त्याआधी आमिरच्या या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा OTT वर रिलीज होणार का अशी चर्चा सुरु आहे.
अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर लगेचच OTT वर प्रदर्शित होतात, त्यामुळेच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांमधील उत्सुकता थोडी कमी झाली आहे.
याबद्दल बोलताना आमिर खान म्हणतो, " थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची उत्सुकता कमी झाली आहे, कारण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर लगेचच OTT वर येतात, आणि यात काहीच गैर नाही. पण ते OTT वर लवकर येतात. त्यामुळे मी नेहमीच माझ्या चित्रपटांसाठी ६ महिन्यांचा गॅप ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मला माहित नाही की इंडस्ट्री काय फॉलो करते, पण मला 6 महिन्यांचे अंतर ठेवणे आवडते. म्हणून मी माझ्या सर्व चित्रपटांसाठी हाच प्रयत्न करतो. त्यामुळे आमिर खानचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या ६ महिन्यांपर्यंत तो ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही असंच वाटतंय. सध्या आमिर खान लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, अशी विनंती त्याने केली आहे.