आमिर खानला या अभिनेत्याची नक्कल करणं पडलं खूप महागात, ढसाढसा रडला होता अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:09 IST2025-03-12T11:07:54+5:302025-03-12T11:09:09+5:30
Aamir Khan: आमिर खान गेल्या ५२ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. 'यादों की बारात' या चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते.

आमिर खानला या अभिनेत्याची नक्कल करणं पडलं खूप महागात, ढसाढसा रडला होता अभिनेता
आमिर खान (Aamir Khan) गेल्या ५२ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. 'यादों की बारात' या चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. बालपणात अनेक चित्रपट केल्यानंतर, १९८८ साली बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट तरुण अभिनेता म्हणून कमबॅक केले. त्याच्या 'कयामत से कयामत तक' या पहिल्या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. ३७ वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याला मिस्टर परफेक्शनिस्टचा टॅग मिळाला आहे. जेव्हा आमिरने त्याचा पहिला सुपरहिट चित्रपट 'कयामत से कयामत तक'नंतर अनिल कपूरची नक्कल करणं त्याच्या अंगाशी आलं होतं. तो इतका त्यात अडकला होता की त्याच्याकडे रडण्याशिवाय काही पर्याय नव्हता. याचा खुलासा खुद्द आमिर खानने केला आहे.
अलीकडेच पीव्हीआर आयनॉक्सने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधताना 'पीके' अभिनेत्याने कयामत से कयामत तकच्या यशानंतर मोठी चूक केल्याची आठवण सांगितली. त्यावेळची आठवण करून देताना आमिर खान म्हणाला की, पहिलाच चित्रपट हिट झाल्यानंतर त्याला जवळपास ३०० ते ४०० चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. चित्रपट साईन करणे ही किती मोठी जबाबदारी असते, हे त्या वेळी त्यांना कळलेही नाही. अभिनेता म्हणाला, "त्यावेळी अभिनेते एकाच वेळी ३० ते ४० चित्रपट करत असत. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे अनिल कपूरने सर्वात कमी ३३ चित्रपट केले. त्यांना पाहून मीही एकाच वेळी ९ ते १० चित्रपट साइन केले. मात्र, त्यापैकी एकाही दिग्दर्शकाने मला माझ्या आवडीची भूमिका ऑफर केली नाही. चित्रपटांचे शूटिंग सुरू झाल्यानंतर मला माझी चूक कळली आणि मी घरी जाऊन खूप रडलो."
एका सुपरहिटनंतर आमिर खानने दिले तीन फ्लॉप सिनेमे
त्या घटनेची आठवण करून देताना आमिर खान म्हणाला की, त्याच्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम म्हणजे 'कयामत से कयामत तक'नंतर त्याचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि मीडियाने त्याला 'वन टाइम वंडर' म्हणून टॅग दिला. अभिनेत्याने सांगितले की त्याचे 'लव्ह-लव्ह-लव्ह', 'ऑल नंबर', तुम मेरे हो बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप झाले होते. त्यामुळे त्याला खूप काळजी वाटू लागली. आमिरने सांगितले की, त्यावेळी त्याला अशा परिस्थितीत अडकल्याचे जाणवत होते, ज्यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी खूप कठीण होते.