Box Office Collection 2: आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बसला फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:32 PM2022-08-13T13:32:06+5:302022-08-13T13:49:05+5:30
Laal Singh Chaddha box office collection: ‘लाल सिंग चड्ढा’च्या पहिल्या दोन दिवसांच्या कलेक्शनचे आकडे निराशाजनक आहेत. सोशल मीडियावरील चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी महागात पडताना दिसतेय.
Laal Singh Chaddha Box Office Collection Day 2: आमिर खान(Aamir Khan) चा 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा आमिर खानच्या ड्रिम प्रोजेक्ट पैकी एक आहे, त्यामुळे या चित्रपटाकडून अभिनेत्याला खूप अपेक्षा होत्या. पण 'लाल सिंग चड्ढा'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता हा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतंय नाहीय. चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास १२ कोटींची कमाई केली होती आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. जे पाहून असे म्हणता येईल की हा चित्रपट थिएटरमध्ये फार काळ तग धरुन राहणं कठीण आहे.
लाल सिंह चड्ढा बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. ज्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही परिणाम झाल्याचं दिसतंय.
दुसऱ्या दिवशी केली इतकी कमाई
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 7 कोटींचा बिझनेस केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 19 कोटींच्या आसपास गेली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींचा गल्ला जमावला आहे. 2022 मधील चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनच्या तुलनेत हा आकडा ठीकठाक वाटत असला तरी आमिरचा सिनेमा म्हटल्यानंतर हा आकडा फार काही समाधानकारक नाही. 180 कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपटला रक्षाबंधनच्या सुट्टीचा फारसा फायदा झालेला दिसत नाहीय.
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' एकाच दिवशी रिलीज झालेत. मोठे स्टार्स असून बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपट काही खास कमाल दाखवू शकले नाहीत.