Laal Singh Chaddha Trailer: जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:07 AM2022-05-30T11:07:03+5:302022-05-30T11:19:14+5:30

Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा दीर्घ काळापासून चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहताना अनेकदा त्याच्या ‘थ्री इडियट्स’ची आठवण येते.

aamir khan kareena kapoor laal singh chaddha trailer out | Laal Singh Chaddha Trailer: जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर

Laal Singh Chaddha Trailer: जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर

googlenewsNext

Laal Singh Chaddha Trailer:  आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा दीर्घ काळापासून चर्चेत आहे. आमिरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चाहत्यांना प्रतीक्षा होती. अखेर या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काल रविवारी आयपीएलच्या फायनलदरम्यान आमिरने ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर रिलीज केला. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड झाला.

‘लाल सिंह चड्ढा’ ही एका सामान्य माणसाची कथा आहे. ट्रेलरमध्ये आमिरचं बालपण ते तारूण्यापर्यंतचा प्रवास, करिना (Kareena Kapoor Khan ) व आमिरच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते.

 

बालपणी लाल सिंह चड्ढाला  चालताना समस्या होत असते.  तो मानसिकरित्याही इतरांच्या तुलनेत वेगळा असतो. त्याची आई लेकाला आयुष्यभर जपते, त्याला घडवते. त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहताना अनेकदा त्याच्या ‘थ्री इडियट्स’ची आठवण येते. करिना व आमिरची जोडी याआधीही पडद्यावर एकत्र आली आहे. या चित्रपटातही ही जोडी एकत्र आहे. मोना सिंग हिने आमिरच्या आईची भूमिका साकारली आहे. जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है, पेट भर जाता है, मन नहीं, हा ट्रेलरमधील डायलॉग मनाला भावतो.  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतो.

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचं कळतंय. देशातील   100 वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे.   अद्वैत चंदन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Web Title: aamir khan kareena kapoor laal singh chaddha trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.