Aamir Khan-Kiara Advani: आमिर आणि कियाराची नवीन जाहिरात वादात; विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 08:54 PM2022-10-10T20:54:49+5:302022-10-10T20:55:24+5:30

आमिर खान आणि कियारा अडवाणीच्या नवीन जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होतोय.

Aamir Khan-Kiara Advani trolled for hurting hindu sentiments in new bank ad | Aamir Khan-Kiara Advani: आमिर आणि कियाराची नवीन जाहिरात वादात; विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केला प्रश्न

Aamir Khan-Kiara Advani: आमिर आणि कियाराची नवीन जाहिरात वादात; विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केला प्रश्न

googlenewsNext

Aamir Khan-Kiara Advani: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) त्यांच्या एका नवीन जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या जाहिरातीतून हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय. नेटकरी या जाहिरातीवर सडकून टीका करत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीसुद्धा जाहिरात ट्विटरवर शेअर करत त्यावर निशाणा साधला आहे. 

सोशल मीडियावर आमिर-कियारा ट्रोल
आमिर खान आणि कियारा अडवाणी त्यांच्या नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत. आमिर आणि कियाराने एयू बँकेसाठी एक जाहिरात शूट केली. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही टीव्ही जाहिरात सोशल मीडियावर ट्रोल केली जात आहे. अशा जाहिरातींसाठी फक्त हिंदू धर्मच का निवडला जातो, असे प्रश्न विचारले जात आहेत. जाहिरातीसोबत आमिर खान आणि कियारा अडवाणी यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 

विवेक अग्निहोत्रींची टीका


या जाहिरातीवरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर जाहिरात शेअर करत लिहिले की, ''मला समजत नाही की, सामाजिक आणि धार्मिक प्रथा बदलण्यासाठी बँका कधीपासून काम करत आहेत? या बँकेने भ्रष्ट बँकिंग व्यवस्था बदलण्यासाठी कामे करावी. असा मूर्खपणा करता आणि पुन्हा म्हणता की, हिंदू ट्रोल करतायत,'' असे ट्विट अग्निहोत्रींनी केले. या जाहिरातीवर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

जाहिरातीत नेमकं काय?
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या जाहिरातीत आमिर आणि कियारा नवविवाहित दाम्पत्याच्या भूमिकेत आहेत. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येते की, नवरा हा नवरीच्या घरी राहायला आला आहे. वधूच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी तो तिच्या घरी राहायला येतो. मूळात वधू नवऱ्याच्या घरात गृहप्रवेश करण्याची प्रथा आहे. या जाहिरातीत आमिर म्हणतो की, 'शतकांपासून चालू असलेल्या प्रथा चालूच ठेवण्यात काय अर्थ?'

Web Title: Aamir Khan-Kiara Advani trolled for hurting hindu sentiments in new bank ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.