Laal Singh Chaddha : खेळ खल्लास!  ‘लाल सिंग चड्ढा’ने 15 दिवसांत कमावले फक्त इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:47 PM2022-08-26T17:47:29+5:302022-08-26T17:48:35+5:30

Laal Singh Chaddha Box Office collection Day 15 : या वर्षांत बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज झालेत आणि आलेत तसे दणकून आपटले. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा यापैकीच एक. 

aamir khan Laal Singh Chaddha Box Office collection Day 15 | Laal Singh Chaddha : खेळ खल्लास!  ‘लाल सिंग चड्ढा’ने 15 दिवसांत कमावले फक्त इतके कोटी

Laal Singh Chaddha : खेळ खल्लास!  ‘लाल सिंग चड्ढा’ने 15 दिवसांत कमावले फक्त इतके कोटी

Laal Singh Chaddha Box Office collection Day 15 : या वर्षांत बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज झालेत आणि आलेत तसे दणकून आपटले. आमिर खानचा (Aamir Khan ) ‘लाल सिंग चड्ढा’ हा यापैकीच एक. आमिरचा हा सिनेमा रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत आणि 15 दिवसांतच चित्रपटाचा खेळ संपला. याचबरोबर आमिरचं चार वर्षांनंतर केलेलं कमबॅकही फसलं. ‘फॉरेस्ट गम्प’चा हा हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी अपेक्षा आमिरला होती. पण बायकॉटच्या त्सुनामीत आमिरचं हे सुंदर स्वप्न भंग झालं. 15 दिवसांत या चित्रपटाने केवळ 58.73 कोटी कमाई केली. चित्रपटाचा बजेट 180 कोटी रूपये आहे. अशात हा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. 15 दिवसांत या चित्रपटाला पूर्णपणे 60 कोटी देखील वसूल करता आलेले नाहीत.

बॉलिवूडसाठी हे वर्ष वाईट ठरलं. एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले. रणबीर कपूरचा शमशेरा, रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार, अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज, अजय देवगणचा रनवे 34 अशा सगळ्याच सिनेमांनी प्रेक्षकांची निराशा केली. धाकड, हिरोपंती 2, रक्षाबंधन, जर्सी, दोबारा हे यावर्षी रिलीज झालेले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेत. याऊलट साऊथच्या काही सिनेमांनी यावर्षी चांगली कमाई केली. आरआरआर, केजीएफ 2, कार्तिकेय, विक्रांत रोणा, विक्रम या सिनेमांनी बक्कळ कमाई केली.

150 कोटींची डील 50 कोटींवर आली..!
आमिर खानचालाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने ‘लाल सिंग चड्ढा’चे राईट्स खरेदी केले आहेत. पण कमी किमतीत. होय, मेकर्सने नेटफ्लिक्सला 150 कोटींची डील दिली होती. पणबॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षक मिळेनात म्हटल्यावर नेटफ्लिक्सने 150 कोटी देण्यास नकार दिला. अखेर ‘लाल सिंग चड्ढा’च्या मेकर्सलाच तडजोड करावी लागली. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’साठी अखेर 50 कोटींवर डील फायनल झाली.

Web Title: aamir khan Laal Singh Chaddha Box Office collection Day 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.