देशात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या ‘Laal Singh Chaddha’नं विदेशात केली कमाल; वाचा, वर्ल्डवाइड बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:52 IST2022-08-22T17:46:21+5:302022-08-22T17:52:22+5:30
Laal Singh Chaddha Worldwide Box Office Collection : 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने 11 दिवसांत केवळ 54.10 कोटींची कमाई केली. पण हो, विदेशातील ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाई मात्र थक्क करणारी आहे.

देशात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या ‘Laal Singh Chaddha’नं विदेशात केली कमाल; वाचा, वर्ल्डवाइड बिझनेस
आमिर खानचा ( Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाकडून सर्वांनाच अपेक्षा होती. पण सिनेमानं सगळ्यांचीच निराशा केली. भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा डिजास्टर सिद्ध झाला. 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत केवळ 54.10 कोटींची कमाई केली. पण हो, विदेशातील ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाई मात्र थक्क करणारी आहे. होय, ‘लाल सिंग चड्ढा’ने वर्ल्डवाइड 108 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात आमिरच्या या सिनेमावर उड्या पडत आहेत. आता चीनमध्येही हा सिनेमा रिलीज करण्याची तयारी सुरू झाली आहे.
‘लाल सिंग चड्ढा’चा बजेट 140-160 कोटींच्या घरात आहे. या चित्रपटाने भारतात रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी केवळ 1.25 कोटी कमाई केली. शनिवार आणि रविवारचं कलेक्शनही जवळपास इतकंच होतं. प्रेक्षक नसल्याने अनेक ठिकाणी ‘लाल सिंग चड्ढा’चे शो कॅन्सल केले जात आहे. विदेशी बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परदेशात या चित्रपटाने 11 दिवसांत 60 कोटींच्या वर कमाई केली आहे. म्हणजेच वर्ल्ड वाईड कमाईचा विचार केला तर आमिरच्या सिनेमाने 100 कमाईचा टप्पा कधीच ओलांडला आहे.
विदेशी बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ सर्वाधिक प्रतिसाद ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका व कॅनडात मिळत आहे. या चार देशात गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाने 12 कोटींवर गल्ला जमवला. लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिरच्या पीके, दंगल, सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटांनी चीनमध्ये बंपर कमाई केली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ ही चीनमध्ये अशीच बंपर कमाई करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.