आमिर खानच्या सिनेमाने पहिल्या दिवशी केला होता ५२ कोटींचा गल्ला, अन् तिसऱ्याच दिवशी ठरला फ्लॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:40 AM2023-07-31T11:40:36+5:302023-07-31T11:43:29+5:30
बॉक्स ऑफिसवर या सिनेमा ५२.२५ कोटींची कमाई करत धमाका केला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बाहुबलीच्या कलेक्शना मागे टाकलं होतं, पण...
आमिर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. तो आपल्या प्रत्येक सिनेमासाठी जीवतोड मेहनत करतो. ३ इडियट्स, लगान आणि दंगल ही सिनेमा त्याचच उदाहरण आहेत. त्याचा प्रत्येक सिनेमा हा पहिल्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. कोणतीही भूमिका तो पडद्यावर जीवंत करतो. सध्या आमिर खानच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल दाखवू शकत नाहीत. एकानंतर त्याचे एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतायेत. पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात नेमकी कशी आणि कोणत्या सिनेमाने झाली. आमिर खानचा सिनेमा रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमा ५२.२५ कोटींची कमाई करत धमाका केला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बाहुबलीच्या कलेक्शना मागे टाकलं होतं. मात्र तिसऱ्याच दिवशी हा सिनेमा फ्लॉप झाला.
आमिर खानसोबत २०१७पर्यंत सगळं काही ठीक सुरु होतं. सीक्रेट सुपरस्टार हा त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यानंतर २०१८मध्ये त्याचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' रिलीज झाला. विजय कृष्णा आचार्य यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं यात आमिर खानशिवाय अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही मुख्य भूमिका होत्या. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या दिवशीचा गल्ला जवळपास ५२ कोटींचा होता. मात्र सिनेमाच्या वाईट रिव्ह्यूचा कमाईवर परिणाम केला. जवळपास २५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १४५ कोटी कमाई केली होती. हा आमिरच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला.
यासिनेमानंतर आमिर खानचा बॉक्स ऑफिसवर जो संघर्ष सुरु झाला तो अजूनही सुरु आहे. २०२२मध्ये जवळपास चार वर्षांनी आमिरने 'लाल सिंग चड्ढा'मधून कमबॅक केला. मात्र बिग बजेट तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरु शकला नाही. परिणामी तो फ्लॉप झाला.