‘परदेसी परदेसी’ गाण्याने रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्रीने प्रेमात सगळं काही गमावलं, वाचा तिची स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:00 AM2022-02-08T08:00:00+5:302022-02-08T08:00:08+5:30
Pratibha Sinha : प्रतिभा ही दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी. ‘परदेसी परदेसी’ गाण्याने ती रातोरात स्टार झाली आणि काही काळानंतर अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली.
आमिर खानच्या (Aamir Khan ) ‘राजा हिंदुस्तानी’ (Raja Hindustani) या चित्रपटाचं नाव काढलं तरी आठवते ते ‘परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोडके मुझे छोडके’ हे गाणं. पाठोपाठ आठवते ती या गाण्यातील बंजारन. होय, बंजारनची भूमिका साकारणाऱ्या या गाण्यातील एका चेहऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तिचं नाव प्रतिभा सिन्हा. ही प्रतिभा सिन्हा आता कुठे आहे, काय करते? असे प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडत असतील. प्रतिभा सिन्हा (Pratibha Sinha) हिच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. प्रतिभा ही दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी. ‘परदेसी परदेसी’ गाण्याने ती रातोरात स्टार झाली आणि काही काळानंतर अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली.
मोजून केवळ 13 सिनेमे
1992 साली ‘मेहबूब मेरे मेहबूब’ या सिनेमाद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. पण तिचं फिल्मी करिअर फार छोटं राहिलं. मोजून केवळ 13 सिनेमे तिच्या वाट्याला आलेत. करिअरपेक्षा प्रतिभा सिन्हा तिच्या प्रेमप्रकरणामुळे जास्त चर्चेत राहिली.
अन् प्रेमासाठी करिअर डावावर लावलं...
1992 साली प्रतिभाने एन्ट्री घेतली आणि नेमक्या याच काळात एका विवाहित पुरूषाच्या प्रेमात वेडी झाली होती. तो कोण तर नदीम सैफी. होय, प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण मधील नदीम सैफीवर प्रतिभाचा जीव जडला होता. नदीम सैफी व प्रतिभा सिन्हाचं अफेअर त्याकाळी प्रचंड चर्चेत होतं. नदीमच्या प्रेमात प्रतिभा इतकी वेडी झाली होती की, त्याच्यासाठी तिने तिचं फिल्मी करिअर डावावर लावलं.
कोडवर्डची भाषा...
प्रतिभाची आई माला सिन्हाला नदीम अजिबात आवडत नसे. त्यामुळे प्रतिभाने जगापासून आणि आई दोन्हीपासून आपलं प्रेम लपवून ठेवलं होतं. अगदी या अफेअरबद्दल कोणाला भणक लागू नये म्हणून प्रतिभा व नदीम कोडवर्डमध्ये बोलत. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रतिभाचे कोड नेम Ambassador तर नदीमचे कोडनेम Ace होते. पण लपवून किती लपवणार? अखेर लोकांना दोघांच्या या कोडवर्डबद्दल कळलंच. अखेर प्रतिभा व नदीमला आपल्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागली.
अन् सगळं संपलं...
माला सिन्हाने आपल्या लेकीला समजवण्याचे बरेच प्रयत्न केलेत. कारण नदीम आधीच विवाहित होता. प्रतिभाला हे माहित होतं. पण तरीही ती त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी माला सिन्हा यांनी प्रतिभाला कायमचं चेन्नईला पाठवलंं. यानंतर या लव्हस्टोरीत एक असं वळण आले की, सगळं काही विस्कटलं.
होय, अफेअर चव्हाट्यावर आल्यावर एका मुलाखतीत नदीम याबद्दल बोलला होता. पण तो असं काही बोलला की, सगळंच संपलं. ‘आई आणि मुलगी (माला सिन्हा व प्रतिभा) मिळून माझ्याशी गेम खेळत होत्या. माझ्या नावाचा वापर करून त्यांना पब्लिसिटी हवी होती. मी केवळ प्रतिभाची मदत करू इच्छित होतो. कारण ती टॅलेन्टेड आहे आणि म्हणून मी तिच्या जवळ गेलो होतो. पण आता आमच्यात काहीही नाही,’ असं नदीम त्या मुलाखतीत बोलला. यानंतर काय झालं असेल ती कल्पना तुम्ही करू शकतात. 1998 साली प्रदर्शित ‘मिल्ट्रीराज’ या सिनेमात प्रतिभा अखेरची दिसली होती. त्यानंतर ती जणू गायब झाली. आता ती आई माला सिन्हासोबत अज्ञातवासात आयुष्य जगतेय, एवढंच तिच्याबद्दल लोकांना ठाऊक आहे.