Laal Singh Chaddha: 'लाल सिंह चड्ढा'च्या अपयशाने आमिर खानला जबर धक्का, आता घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:08 PM2022-08-16T14:08:08+5:302022-08-16T14:09:18+5:30

Laal Singh Chaddha: आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 'लाल सिंह चड्ढा' प्रेक्षकांनी नाकारला आहे.

AAmir Khan on Laal Singh Chaddha: Aamir Khan shocked by the failure of 'Laal Singh Chadha', now took a big decision regarding distributors | Laal Singh Chaddha: 'लाल सिंह चड्ढा'च्या अपयशाने आमिर खानला जबर धक्का, आता घेतला मोठा निर्णय

Laal Singh Chaddha: 'लाल सिंह चड्ढा'च्या अपयशाने आमिर खानला जबर धक्का, आता घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

Aamir on Laal Singh Chaddha: अभिनेता आमिर खान 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. आमिर चित्रपट करण्यासाठी दोन वर्षांचा वेळ घेतो आणि त्यात तो जीव ओतून काम करतो. लेखनापासून ते दिग्दर्शन आणि गाण्यांपर्यंत, प्रत्येक पैलूवर त्याचे बारकाईने लक्ष असते. चित्रपटाचे प्रमोशनही तो वेगळ्या अंदाजात करत असतो. पण, गेल्या काही काळापासून तो प्रेक्षकांची नाडी ओळखू शकलेला नाही. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप झाल्यानंतर तो 'लाल सिंग चड्ढा' घेऊन आला, पण या चित्रपटानेही प्रेक्षकांची निराशा केली.

वितरकांचे पैसे परत करणार
हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवण्यासाठी आमिरने खूप प्रयत्न केले होते. हक्क मिळवल्यानंतर चित्रपट बनवतानाही त्यांने प्रचंड मेहनत केली. अनेक वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करत होता. पण, चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली असून, पाच दिवसात केवळ 48 कोटींची कमाई करू शकला आहे. या अपयशानंतर आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिरने आता वितरकांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.


आमिरला जबरदस्त धक्का
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, आमिरने या चित्रपटावर खूप मेहनत घेतली होती. पण, प्रेक्षकांनी चित्रपट नाकारल्याने आमिरला जबरदस्त धक्का बसला आहे. चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आहे. यामुळेच त्याने वितरकांचे नुकसान भरुन काढण्याचा निर्णय घेतलाय. 

चित्रपटाचे कामगिरी
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा'ने गुरुवारी 11.7 कोटी, शुक्रवारी 7.26 कोटी, शनिवारी 9 कोटी, रविवारी 10 कोटी आणि 15 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी 8 ते 9 कोटींचा व्यवसाय केला. अशा प्रकारे या चित्रपटाने जवळपास 47 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात आमिर खानशिवाय करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: AAmir Khan on Laal Singh Chaddha: Aamir Khan shocked by the failure of 'Laal Singh Chadha', now took a big decision regarding distributors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.