Laal Singh Chaddhaला बायकॉट करणाऱ्यांना आमिर खान म्हणाला- 'तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:12 PM2022-08-10T18:12:55+5:302022-08-10T19:01:03+5:30

'लाला सिंग चढ्ढा' चित्रपटावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. आमिरने पुन्हा एकदा ट्रोलर्सना एक मेसेज दिला आहे.

Aamir khan on Laal Singh Chaddha boycott trend reacts on trolling request fans | Laal Singh Chaddhaला बायकॉट करणाऱ्यांना आमिर खान म्हणाला- 'तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर...'

Laal Singh Chaddhaला बायकॉट करणाऱ्यांना आमिर खान म्हणाला- 'तुम्हाला चित्रपट पाहायचा नसेल तर...'

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान(Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. आमिर खान देशाच्या विविध भागात या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत असून सोशल मीडिया यूजर्स चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. आमिर खान लोकांना प्रत्येक वेळी चित्रपट पाहण्याची विनंती करत आहे. दरम्यान, आमिरने पुन्हा एकदा सोशल मीडिया यूजर्सना एक मेसेज दिला आहे.

ज्यांना चित्रपट पाहायचा नाही त्यांनी..
विरल भियानीने आमिरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर म्हणतो, 'जर मी एखाद्याचे मन दुखावले असेल, तर मला त्याबाबत खेद आहे. मला कोणाला दुखवायचं नाही आणि ज्यांना हा चित्रपट बघायचा नाही, तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो, मी काय करू शकतो. पण जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटात फक्त मीच नाही, हा चित्रपट सर्वांच्या मेहनतीने बनला आहे. मला आशा आहे की लोकांना चित्रपट आवडेल. आमिरने हे देखील म्हणाले गेले की तो  चित्रपटाच्या रिलीजबद्दल नर्वस आहे आणि गेले 48 तास झोपला नाहीय. 

याआधी बायकॉट  ट्रेंडवर बोलताना आमिर म्हणाला होता की, माझे भारत देशावर प्रेम नाही, असे काही लोकांना वाटते हे माहित आहे. पण मला त्या लोकांना सांगायचे आहे की, ते चुकीचा विचार करत आहेत. मला माझा देश आणि देशातील लोकांवर प्रचंड प्रेम आहे.

लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा अद्वैत चंदनने दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात आमिरसोबत करिना कपूर लीड रोलमध्ये आहे. नागा चैतन्या या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

Web Title: Aamir khan on Laal Singh Chaddha boycott trend reacts on trolling request fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.