Video: नव्या सिनेमाची तयारी की आणखी काही? नव्या लुकमध्ये आमिर खानला ओळखणही मुश्कील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:40 AM2021-06-09T10:40:09+5:302021-06-09T10:41:26+5:30
Aamir Khan New Look : फोटो पाहून तुम्हीही पडाल गोंधळात, इंटरनेटवर व्हायरल होतोय व्हिडीओ
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan ) याची बातच वेगळी आहे. होय, त्याची प्रत्येक गोष्ट हटके. म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. स्वत:ची पर्सनल व प्रोफेशनल लाईफ तो अगदी उत्तमरित्या मॅनेज करतो. गेल्या काही दिवसांपासून आमिर सोशल मीडियापासून दूर आहे. लाईमलाईटपासूनही सध्या तो दूर आहे. पण म्हणून आमिरबद्दलचे के्रझ कमी थोडीच होणार. अलीकडे आमिर मुंबईतील एका स्टुडिओबाहेर दिसला. यावेळी तो एकदम नव्या लुकमध्ये दिसला. अगदी पहिल्या नजरेत त्याला ओळखणही कठीण व्हावे इतक्या वेगळ्या लुकमध्ये. (Aamir Khan New Look )
सध्या आमिरच्या याच नव्या लुकची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. त्याचा हा नवा लुक नव्या सिनेमासाठी आहे की यामागे आणखी काही कारण आहे, असा प्रश्न नेटक-यांना पडला. आमिर कायम स्वत:च्या लुकबद्दल नवनवे प्रयोग करताना दिसतो. कधी लांब दाढीत दिसतो तर कधी केस कापून लोकांना धक्का देतो.
एका डबिंग स्टुडिओबाहेर आमिर कॅज्युअल लुकमध्ये दिसला. अगदी छोटे केस, डोळ्यांवर चष्मा, व्हाईट टी-शर्ट आणि बरमुडा शॉट्समध्ये आमिर दिसताच पापाराझींनी त्याला घेरले. त्याचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतोय. अनेक दिवसांनंतर मीडियासमोर आल्यानंतर आमिरने त्यांना हात जोडून अभिवादनही केले.
आमिर खानचा अपकमिंग चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ फारच चर्चेत आहे. त्यातील सरदार लुक प्रेक्षकांना आतापासूनच प्रभावित करत आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ सुपरहिट हॉलिवूड फिल्म ‘द फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. यात करीना कपूर देखील दिसणार आहे.