आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र; 'या' दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यावर बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 08:36 PM2023-07-05T20:36:32+5:302023-07-05T20:47:38+5:30

स्वतंत्र भारताच्या क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार, भारताला पहिला विजय मिळवून दिला, पहिल्याच कसोटीत शतक झळकावले....

Aamir Khan Rakumar Hirani working on Biopic of cricketer Lala Amarnath | आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र; 'या' दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यावर बायोपिक

आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र; 'या' दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यावर बायोपिक

googlenewsNext

Indian Cricketers: बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खानला (aamir khan) त्याचे नशीब सध्या साथ देत नाहीये. बॉलिवूडची हिट मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरचे अखेरचे दोन्ही बिग बजेट चित्रपट सपशेल आपटले. 'लाल सिंह चड्ढा'नंतर त्याने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यातच आता एक मोठी माहिती समोर येती आहे. निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी (rajkumar hirani) आणि आमिर खान पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 

'3-इडियट्स' आणि 'पीके'सारखे सुपरहिट चित्रपट देणारी जोडी पुन्हा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी हे दोघे एका महान व्यक्तीच्या बायोपिकसाठी एकत्र येत आहेत. चित्रपटाची कथा आमिरला खूप आवडली असून त्याने हिरानींना होकार दिल्याची माहिती आहे. हिरानी सध्या शाहरुख खानसोबत 'डंकी' चित्रपटावर काम करत आहे. त्यानंतर ते आमिरसोबत बायोपिकवर काम सुरू करतील. आता हा कोणाचा बायोपिक असेल, हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. 

फरहान अख्तर करणार निर्मिती 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार हिरानी आणि आमिर खान स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार लाला अमरनाथ (lala amarnath) यांच्या बायोपिकसाटी एकत्र येत आहेत. हिराणी 2019 पासून लाला अमरनाथ यांच्या बायोपिकवर काम करत होते. हिरानींनी दोन वर्षांपूर्वी शाहरुख खानला (shahrukh khan) दोन स्क्रिप्ट ऑफर केल्या होत्या, त्यापैकी शाहरुखने 'डंकी'ची निवड केली. दुसरा चित्रपट लाला अमरनाथ यांचा बायोपिक होता, ज्यावर शाहरुखने नंतर विचार करू असे सांगितले होते. आता हा चित्रपट आमिरच्या झोळीत येऊन पडला आहे. फरहान अख्तरची कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट लाल अमरनाथ यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे.

पहिले शतक, पहिला विजय
लाला अमरनाथ स्वतंत्र भारताच्या क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी भारतासाठी पहिले शतकही झळकावले आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांनी कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून भारताला पहिला कसोटी विजयही मिळवून दिला. इतरही अनेक विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावावर आहेत. त्यांची दोन मुले सुरेंद्र अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांनीही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. 1933 मध्ये भारताच्या विश्वचषक विजयाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथ सामनावीर ठरले होते.

Web Title: Aamir Khan Rakumar Hirani working on Biopic of cricketer Lala Amarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.