आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचं फरहान अख्तरशी आहे कनेक्शन! तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:19 IST2025-03-16T12:18:45+5:302025-03-16T12:19:38+5:30

गौरी आणि आमिरची २५ वर्षांपासून ओळख आहे . पण फरहान अख्तरशी नेमकं काय कनेक्शन?

Aamir Khan s girlfriend Gauri Spratt has a connection with Farhan Akhtar know more | आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचं फरहान अख्तरशी आहे कनेक्शन! तुम्हाला माहितीये का?

आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचं फरहान अख्तरशी आहे कनेक्शन! तुम्हाला माहितीये का?

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) वयाच्या ६० व्या वर्षी बंगळुरुच्या गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt) डेट करत आहे. त्याच्या या खुलाश्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून आमिर आणि गौरी रिलेशिनशिपमध्ये आहेत. इतकंच नाही तर त्यांची ओळख २५ वर्षांपासून आहे. गौरीला ६ वर्षांचा एक मुलगा आहे. ती एका समजूतदार पार्टनरच्या शोधात होतीच तेव्हा आमिरसोबत तिचं सूत जुळलं. गौरीचं बंगळुरुमध्ये सलून आहे. पण तुम्हाला माहितीये का अभिनेता फरहान अख्तर आणि गौरीचं नेमकं कनेक्शन का?

फरहान अख्तरबॉलिवूडमधील लोकप्रिय नाव.  लेखक, अभिनेता, गायक, दिग्दर्शक, निर्माता अशी त्याचा बहुगुणी ओळख आहे. फरहान अख्तरच्या पहिल्या बायकोचं नाव अधुना भाबानी आहे. २०१७ साली दोघांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. अधुना भाबानी प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आहे. Bbblunt ही तिची स्वत:ची ब्युटी अँड सलून अॅकॅडमी आहे. तर आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, ती याच Bbblunt मध्ये पार्टनर आणि डायरेक्टर आहे. फरहानची पूर्वी पत्नी अधुना भाबानीने २०२२ मध्ये BBblunt विषयी एक पोस्ट केली होती. यामध्ये गौरी स्प्रॅट आणि तिची बहीण शौना स्प्रॅट दिसत आहेत.


गौरी स्प्रॅट सध्या लाईमलाईटमध्ये आहे. आमिर खानने त्याची माध्यमांशी ओळख करुन दिल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. गौरीला फारशी प्रसिद्धी आणि या स्पॉटलाईटची सवय नाही. पण मी तिला यासाठी तयार केलं असल्याचं आमिर खान म्हणाला होता. तसंच त्याने गौरीच्या सुरक्षेचीही व्यवस्था केली आहे. तिच्यासाठी वैयक्तिक बॉडीगार्ड नियुक्त केला आहे. 

Web Title: Aamir Khan s girlfriend Gauri Spratt has a connection with Farhan Akhtar know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.