आमिर-सलमानचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' होणार री-रिलीज; मेकर्सची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:54 IST2025-02-12T16:52:56+5:302025-02-12T16:54:25+5:30
'अंदाज अपना अपना' री-रिलीज होणार असून मेकर्सने तारखेबाबत मोठी घोषणा केली आहे (andaz apna apna, aamir khan, salman khan)

आमिर-सलमानचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' होणार री-रिलीज; मेकर्सची मोठी घोषणा
आमिर खान-सलमान खान (aamir khan) यांचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हो हो, तुम्ही बरोबर वाचताय. 'अंदाज अपना अपना' (andaz apna apna) री-रीलीजची मोठी घोषणा सिनेमाच्या निर्मात्यांनी केलीय. इतकंच नव्हे तर उद्या (१३ फेब्रुवारी) 'अंदाज अपना अपना'चा नव्या अंदाजात टीझर रिलीज होणार आहे. 'अंदाज अपना अपना' कधी रिलीज होणार? याविषयी मेकर्सने मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या सविस्तर.
'अंदाज अपना अपना' होणार री-रीलीज
आमिर खान-सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंदाज अपना अपना' सिनेमा एप्रिलमध्ये पुन्हा रिलीज होणार आहे. अमर, प्रेम, राम गोपाल बजाज, क्राईम मास्टर गोगो, तेजा हे 'अंदाज अपना अपना'मधील सर्वच कॅरेक्टर्स चांगलेच गाजले. अशातच 'अंदाज अपना अपना' पुन्हा रिलीज होणार असल्याने ३१ वर्षांपूर्वी थिएटरमध्ये ज्यांना बघता आला नाही, त्या प्रेक्षकांना 'अंदाज अपना अपना' थिएटरमध्ये बघून खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. सिनेमाची रिलीज डेट १३ फेब्रुवारीला जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
इतकंच नव्हे तर 'अंदाज अपना अपना' 4K मध्ये होणार रीलीज आहे. निर्माते विनय सिन्हा आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी 'अंदाज अपना अपना' 4K रंगावृत्तीत रीलीज करणार आहे. 'अंदाज अपना अपना' सिनेमात आमिर खान, सलमान खानसोबतच करिश्मा कपूर, रवीना टंडन, शक्ती कपूर, परेश रावल, विजू खोटे या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडमधील एक कल्ट क्लासिक कॉमेडी सिनेमा म्हणून 'अंदाज अपना अपना' ओळखला जातो.