पहिलाच चित्रपट हीट ठरला अन् धडाधड ३०० ते ४०० चित्रपटांच्या ऑफर आल्या, कोण होता तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:18 IST2025-03-12T13:18:03+5:302025-03-12T13:18:15+5:30
अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानंतर नशिबचं उजळलं.

पहिलाच चित्रपट हीट ठरला अन् धडाधड ३०० ते ४०० चित्रपटांच्या ऑफर आल्या, कोण होता तो?
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांच्या सिनेमांनी बॅक टू बॅक अनेक रेकॉर्ड्स मोडले, बॉक्स ऑफिस गाजवलं. आपल्या अभिनयाच्या बळावर जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला. काही क्लट चित्रपट बॉलिवूडला दिले. असाच एक अभिनेता आहे, ज्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानंतर त्याचं नशिबचं उजळलं. पहिला चित्रपट हीट ठरताच त्या अभिनेत्याला एक एक-दोन नव्हे तर थेट३००-४०० चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. हे ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
तो मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आहे आमिर खान (Aamir Khan). आमिर खानने ९० च्या दशकात त्याने एक वेगळंच स्टारडम अनुभवलेलं आहे. जेव्हा आमिर खानचा पहिला 'कयामत से कयामत तक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. तेव्हा त्याचे नशीब बदललं होतं. या चित्रपटानंतर त्याला एक-दोन नव्हे तर जवळजवळ ३००-४०० चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. अलिकडेच फिल्म फेस्टिव्हलच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये आमिरने याबद्दल खुलासा केला.
सध्या आमिर खानचं करिअर थोडं मंदावल्याचं दिसतंय. तो गेली काही वर्ष पडद्यावरुन गायब राहिला. २०२२ साली त्याचा 'लाल सिंह चड्डा' सिनेमा आपटला आणि आमिर गायबच झाला होता. पण, आता लवकरच तो 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. हा २००७ साली आलेल्या 'तारे जमीन पर' चा सीक्वेल आहे. यामध्ये जिनिलिया देशमुखचीही भूमिका आहे.