आमिर खानची नवी गर्लफ्रेंड गौरीला भेटून अभिनेत्याच्या बहिणीची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली- "आमच्या कुटुंबात ती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:42 IST2025-03-21T09:40:59+5:302025-03-21T09:42:19+5:30
आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला अभिनेत्याची बहीण भेटल्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (aamir khan)

आमिर खानची नवी गर्लफ्रेंड गौरीला भेटून अभिनेत्याच्या बहिणीची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली- "आमच्या कुटुंबात ती..."
आमिर खान (aamir khan) हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. आमिर खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबद्दल (gauri spratt) सर्वांना सांगितलं. आमिरची नवी गर्लफ्रेंड पाहून सर्वांना सुखद धक्का बसलाय. अशातच आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडला भेटून त्याची सख्खी बहीण निखत हेगडेने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. नुकतीच आमिरची बहीण निखत त्याच्या गर्लफ्रेंडला भेटली. त्यावेळी तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
आमिरच्या गर्लफ्रेंडबद्दल बहीण काय म्हणाली
'टाइम अपलॉड ट्रेंड्स'ला दिलेल्या मुलाखतीत बहीण निखतने भाऊ आमिरच्या रिलेशनशीपबद्दल खास खुलासा केला. आमिरची गर्लफ्रेंड गौरीला भेटून ती म्हणाली, "आम्ही आमिर आणि गौरीसाठी खूप आनंदी आहोत. कारण ती खूप चांगली व्यक्ती आहे. हे दोघंही आयुष्यात कायम सुखी राहावेत हीच इच्छा आहे." अशाप्रकारे आमिरच्या बहिणीने भावाच्या नवीन गर्लफ्रेंडचं कुटुंबात स्वागत केलं.
आमिरची नवी गर्लफ्रेंड काय करते?
आमिर खान रिलेशनशिपमध्ये असून त्याने गर्लफ्रेंडला गौरी स्प्रॅटला वाढदिवशी माध्यमांसमोर आणलं. गौरी स्प्रॅट बंगळुरुची रहिवासी आहे. सध्या ती आमिर खानच्या प्रोडक्शनमध्येच काम करते. लिंक्डइन प्रोफाईलनुसार, गौरीने २००२ ते २००४ काळात लंडनच्या आर्ट्स युनिव्हर्सिटीमधून फॅशन, स्टायलिंग अँड फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. तसंच बी ब्लंट हेअरड्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ती पार्टनर आणि डायरेक्टर पदावर आहे. गौरी सध्या आमिर खान प्रोडक्शनमध्ये काम करते.