मुहूर्त ठरला! यशराज बॅनरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आमिर खानचा मुलगा जुनैद
By गीतांजली | Updated: October 21, 2020 13:33 IST2020-10-21T13:26:59+5:302020-10-21T13:33:11+5:30
आमिर खानचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी कसून मेहनत करतो आहे.

मुहूर्त ठरला! यशराज बॅनरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार आमिर खानचा मुलगा जुनैद
आमिर खानचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी कसून मेहनत करतो आहे. काही दिवसांपूर्वी तो मल्याळम सिनेमा 'इश्क'च्या रिमेकमधून एंट्री घेणार अशी चर्चा रंगली होती मात्र तो ऑडिशनमधून रिजेक्ट झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे करत होते. वडिल आमिर खानने जुनैदची याबाबती कोणतीच मदत करायची नाही असे ठरवले आहे.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार जुनैद लवकरच यशराज बॅनरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिपोर्टनुसार या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा करणार आहेत. जुनैद या सिनेमात एक अशा व्यक्तिची भूमिका साकारणार आहे जो ढोंगी बाबाचा भांडाफोड करणार आहे. या सिनेमात जुनैदच्या अपोझिट 'बंटी ओर बबली2'मधून इंडस्ट्रीत डेब्यू करणारी शर्वरी वाघ दिसणार आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे. सिनेमात जुनैद एका न्यूजपेपर एडिटरची भूमिका करणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा यशराजकडून नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
जुनैद 'पीके'चा सहाय्यक दिग्दर्शक होता
आमिर खानचा मुलगा जुनैद हा चित्रपट 'पीके' मध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा सहाय्यक दिग्दर्शक होता.आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने नुकतेच आगामी सिनेमा 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.