आमिर खानचा मुलगा या सिनेमाच्या ऑडिशनमधून झाला रिजेक्ट, वडिल नाही करणार लाँच
By गीतांजली | Updated: October 20, 2020 13:13 IST2020-10-20T12:59:53+5:302020-10-20T13:13:45+5:30
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद लाईमलाईटपासून दूर थिएटर करतो आहे.

आमिर खानचा मुलगा या सिनेमाच्या ऑडिशनमधून झाला रिजेक्ट, वडिल नाही करणार लाँच
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद लाईमलाईटपासून दूर थिएटर करतो आहे. अलीकडेच चर्चा होती की, जुनैद मल्याळम सिनेमा इश्कच्या रिमेकसाठी तयारी करत होता. आता कळतेय की, जुनैदने यासिनेमासाठी ऑडिशन दिले होते, मात्र ही भूमिका त्याला मिळाली नाही. रिपोर्टनुसार आमिर खानने हे स्पष्ट केले आहे की तो जुनैदची कोणतीच मदत करणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, जुनैद मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये डेब्यू करणार होता हे खरे नाही. खरं तर, या भूमिकेसाठी त्याने ऑडिशन दिले, पण त्याचे सिलेक्शन झाले नाही. थिएटरमध्ये अभिनय करताना तो चित्रपटांसाठी ऑडिशन देतो आहे. आमिर खान पूर्णपणे स्पष्ट आहे की तो जुनैदला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही.
मुलाच्या डेब्यूबाबत काय म्हणाल आमिर खान
मुलाने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याबाबत आमिर म्हणाला होता, मला वाटते की त्याच्यावर हे अवलंबून आहे की त्याने आपले आयुष्य जगावे आणि स्वतःचे निर्णय घ्यावेत. मी सगळं काही त्याच्यावर सोडले आहे. तो थिएटर करतो आहे आणि चांगलं काम करतोय. तो स्वत: चा मार्ग स्वत: बनवू शकतो.
जुनैद 'पीके'चा सहाय्यक दिग्दर्शक होता
आमिर खानचा मुलगा जुनैद हा चित्रपट 'पीके' मध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा सहाय्यक दिग्दर्शक होता.आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने नुकतेच आगामी सिनेमा 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.