SEE PICS : तैमूर, अबराम, आझाद सर्वांनी फोडली दहीहंडी, फोटो पाहून पडाल प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 13:11 IST2019-08-25T13:09:36+5:302019-08-25T13:11:17+5:30
संपूर्ण देशभर दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला.

SEE PICS : तैमूर, अबराम, आझाद सर्वांनी फोडली दहीहंडी, फोटो पाहून पडाल प्रेमात
संपूर्ण देशभर दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला. होय, पापाराझींचा आवडता तैमूर अली खान, किंग खानचा मुलगा अबराम, आमिर खानचा मुलगा आझाद, शिल्पा शेट्टीचा मुलगा विवान अशा सर्वांनी दहीहंडी फोडून उत्साहात जन्माष्टमी साजरी केली. तैमूर आणि अबरामचे दहीहंडी फोडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तैमूरचे दहीहंडी फोडतानाचे फोओ एकदम खास आहेत. चिमुकला तैमूर आपल्या एका केअरटेकरच्या खांद्यावर बसून दहीहंडी फोडतोय.
व्हाईट टी-शर्ट आणि हाफ पँटमध्ये तैमूर नेहमीप्रमाणे क्युट दिसतोय. रंगीबेरंगी फुग्यांसह टांगलेली दहीहंडी फोडतानाची उत्सुकता तैमूरच्या चेह-यावर स्पष्ट दिसतेय. तैमूरची कझिन इनायाही यावेळी हजर आहे. एका व्हिडीओत इनाया तैमूरला चिअर करताना दिसतेय.
शाहरुख आणि अबरामचे दहीहंडी फोडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरवर्षी शाहरुख दिवाळी, होळी, ईद असे सण मोठया उत्साहात साजरे करतो. सण साजरे करतानाचा त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ईद साजरी करतानाही शाहरुख आपल्या बाल्कनीत येऊन आपल्या चाहत्यांना ईदनिमित्त शुभेच्छा देतो. जन्माष्टमीचा सणही शाहरूखने अत्यंत उत्हासात साजरा केला. इतकेच नाही, तर मुलगा अबराम याच्यासोबत त्याने दहीहंडीही फोडली. यावेळी शाहरुख आणि अबरामसोबत गौरी खानही उपस्थित होती. दहीहंडी फोडतानाचा अबरामचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
आमिरचा मुलगा आझाद यानेही दहीहंडी फोडली.
शिल्पा शेट्टीचा मुलगा विवान यानेही दहीहंडी फोडत जन्माष्टमी साजरी केली.