बाप असावा तर असा! लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून आमिर खानने मागितली मन्नत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:59 IST2025-01-08T13:58:12+5:302025-01-08T13:59:14+5:30
आमिर खानने त्याचा लेक जुनैद खानच्या सिनेमासाठी एक खास मन्नत मागितलीय. त्यामुळे सर्वांनी आमिरचं कौतुक केलंय (aamir khan, junaid khan)

बाप असावा तर असा! लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून आमिर खानने मागितली मन्नत
आमिर खानचा (aamir khan) लेक जुनैद खान (junaid khan) हा सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. आमिर खानचा मुलगा जुनैदच्या आगामी 'लव्हयापा' (loveyapa) सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. जुनैद आणि खुशी कपूर (khushi kapoor) ही फ्रेश जोडी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आमिर खान लेकाच्या या सिनेमासाठी चांगलाच उत्सुक आहे. इतकंच नव्हे तर सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून आमिरने खास मन्नत मागितली आहे. त्यानुसार आमिर खान एक गोष्ट कायमची सोडणार आहे.
आमिर खान या गोष्टीचा करणार त्याग
एका मीडिया रिपोर्टनुसार आमिर खानने लेकाचा सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून खास मन्नत मागितली आहे. त्यानुसार जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला तर आमिर खान स्मोकिंग अर्थात धुम्रपान कायमचं बंद करणार आहे. लेकासाठी आमिरच्या या निःस्वार्थी प्रेमाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतंय. त्यामुळे जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा कसा चालतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
लव्हयापा कधी रिलीज होणार?
'लव्हयापा' हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीतने या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा हा सिनेमा आहे. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं. या गाण्यात जुनैद-खुशीच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. याशिवाय हा सिनेमा २०२२ साली आलेल्या 'हिट लव्ह टुडे' या तामिळ सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.