एकेकाळी मुंबईत ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:08 PM2022-08-09T15:08:27+5:302022-08-09T15:22:20+5:30

सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

Aamir Khan stick poster of his film qayamat se qayamat tak on auto rickshaw | एकेकाळी मुंबईत ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, जाणून घ्या यामागचे कारण

एकेकाळी मुंबईत ऑटो रिक्षाच्या मागे सिनेमाचे पोस्टर लावायचा आमिर खान, जाणून घ्या यामागचे कारण

googlenewsNext

Laal Singh Chaddha:आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लालसिंग सिंग चड्ढापुढच्या आठवड्यात  प्रदर्शित  होतोय. पण, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाविरोधात बायकॉट मोहिम राबवली जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. चित्रपटाबाबत निर्माण होत असलेल्या नकारात्मक वातावरणावर होते आहे.

आमिर खान लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, अशी विनंती त्याने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉयकॉट लाल सिंह चड्ढा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या बहिष्कारामुळे आमिर नाराज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आमिर खानला सुरवातीला भरपूर संघर्ष करावा लागला. आपला पहिला चित्रपट पाहावा यासाठी तो चक्क रस्त्यावर उतरला होता. 

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा आमिरचा 'कयामत से कयामत तक' (Qayamat Se Qayamat Tak) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा तो चित्रपटाचा उत्तम प्रकारे प्रमोशन करत असे. आमिर चित्रपटाचे पोस्टर्स वेगवेगळ्या ऑटो-रिक्षांमध्ये चिटकवायाचा. आमिर खानचा पहिला चित्रपट म्हणजे कयामत से कयामत, त्याआधी यादों की बारात या चित्रपटामध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. कयामत से कयामत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने चित्रपटातील काही कलाकारांना घेऊन मुंबईमधील टॅक्सी आणि रिक्षांवर चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यास सुरुवात केली.


जुही चावलासोबत केला होता डेब्यू
आमिरने 'कायमत से कयामत तक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती अभिनेत्री जूही चावलासमवेत दिसली होती. हा चित्रपट हीट झाला होता.
 

Web Title: Aamir Khan stick poster of his film qayamat se qayamat tak on auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.