निगेटीव्ह फिडबॅकनंतरही ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ने जमवला १०० कोटींचा गल्ला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 03:11 PM2018-11-11T15:11:28+5:302018-11-11T15:12:19+5:30
होय, केवळ तीनचं दिवसांत ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रदर्शनानंतरच्या पहिल्या दोनचं तासांत समीक्षकांनी या चित्रपटाला सुमार चित्रपटाच्या यादीत टाकले. आमिर व अमिताभच्या ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ने निराशा केली, ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’चा बार फुसका निघाला, असे काय काय समीक्षकांनी लिहिले. समीक्षकांच्या या निगेटीव्ह फिडबॅकनंतर बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला. आमिरचे चाहतेही हिरमुसले. पण आता चिंता करायचे कारण नाही. होय, कारण केवळ तीनचं दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
#ThugsOfHindostan
— taran adarsh (@taran_adarsh) November 11, 2018
HINDI:
Thu 50.75 cr, Fri 28.25 cr, Sat 22.75 cr. Total: ₹ 101.75 cr
TAMIL + TELUGU:
Thu 1.50 cr, Fri 1 cr, Sat 75 lakhs. Total: ₹ 3.25 cr
Total: ₹ 105 cr [5000 screens]
India biz.#TOH
निगेटीव्ह फिडबॅक मिळूनही ताणली गेलेली उत्सुकता आणि धमाकेदार प्रमोशन याचा जबरदस्त फायदा या चित्रपटाला मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे, पहिल्याच दिवशी ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५२.२५ कोटींची कमाई केली. नाही म्हणायला दुसºया दिवशी चित्रपटाच्या कमाईत ५० टक्के घट झाली. पण दुस-या दिवशी चित्रपटाने २८.२५ कोटींचा गल्ला जमवला. तिसºया दिवशी चित्रपटात २२.७५ कोटी कमावले. हिंदी भाषेतील ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ने तीन दिवसांत एकूण १०१.७५ कोटी कमावले आणि तामिळ, तेलगू या भाषेतही या चित्रपटाने १०५ कोटींचा बिझनेस केला. तिसºया दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला गाठला.
महानायक अमिताभ बच्चन आणि आमिर खानची जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट तब्बल ५,००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबत तेलुगु आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्याचाच पुरेपुर फायदा ‘ठग्स आॅफ हिन्दुस्तान’ला झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचाही या चित्रपटाला फायदा झाला आहे.