आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:12 PM2024-11-13T18:12:59+5:302024-11-13T18:14:47+5:30

Aamir Khan : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'तारे जमीन पर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दर्शील सफारीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Aamir Khan told the story of the movie 'Sitare Zamin Par', said - than 'Tare Zamin Par'.. | आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा..

आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा..

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान (Aamir Khan) होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दर्शील सफारीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल सितारे जमीन पर (Sitare Zameen Par) येणार असल्याची चर्चा आहे. 'सितारे जमीन पर'ची जबरदस्त कथा १७ वर्षांनंतर 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सीक्वल 'सितारे जमीन पर' रिलीज होणार आहे, ज्याबद्दल लोकांना खूप अपेक्षा आहेत. आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने आगामी चित्रपटाची कथा आणि त्यातील स्टारकास्टबाबत अनेक खुलासे केले आहेत.

दर्शील सफारी आणि आमिर खान अमोल गुप्तेच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटात कमबॅक करणार आहेत. दर्शील इशानची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या एका मुलाची आणि त्याच्या शिक्षकाची होती. आमिर खान आणि दर्शील सफारी आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या दोघांसोबत जिनिलिया डिसूजा देखील या चित्रपटात दिसणार आहे.

'सितारे जमीन पर' 'चॅम्पियन्स' या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक
२०१८ साली 'चॅम्पियन्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बौद्धिकदृष्ट्या अपंग लोकांच्या टीमने १९९९ ते २०१४ दरम्यान १२ चॅम्पियनशिप कशा जिंकल्या हे चित्रपटाने दाखवले. हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना आमिर खानला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला की हा एक भावनिक चित्रपट आहे जो पाहून तुम्हाला रडू येईल. लोकांना ब्लॉकबस्टर चित्रपट द्यायचा आहे. अशा परिस्थितीत तो खूप मेहनत घेत आहे आणि चित्रपटाच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देत आहे.

'सितारे जमीन पर' या दिवशी येणार भेटीला 
आमिर खानने मुलाखतीत सांगितले की, 'तारे जमीन पर' चित्रपटात ईशान एकटाच होता. शिक्षक त्याला मदत करत होते पण या चित्रपटात कठीण आव्हानांशी झुंजणारे १० लोक आहेत, जे एका सामान्य माणसाला मदत करतात. मिळालेल्या माहितीनुसार, 'सितारे जमीन पर'चे दिग्दर्शक आरएस प्रसन्ना आहेत. आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरण राव याचे निर्माते आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aamir Khan told the story of the movie 'Sitare Zamin Par', said - than 'Tare Zamin Par'..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.