Aamir khan:..तर आज आपल्यात नसता मिस्टर परफेक्शनिस्ट;1.2 सेकंदाने थोडक्यात वाचले आमिरचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:33 AM2023-06-20T11:33:01+5:302023-06-20T11:34:12+5:30
Aamir khan: एक स्टंट करत असताना आमिरचा मोठा अपघात होता होता राहिला.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) वर्षाकाठी केवळ एखादा चित्रपट करतो. मात्र, त्याने केलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो. आमिर चित्रपटांची निवड करताना खूप बारकाईने विचार करतो त्यामुळे त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून म्हटलं जातं. प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येणाऱअया आमिरचा सध्या एक किस्सा चर्चिला जात आहे. एका सिनेमाच्या सेटवर आमिरचा मोठा अपघात झाला होता. या अपघातातून आमिर थोडक्यात बचावला. याविषयी दिग्दर्शक मुकेश भट यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आमिरची मुख्य भूमिका असलेला 'गुलाम' सिनेमा साऱ्यांच्याच लक्षात असेल. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. मात्र, या सिनेमाच्या सेटवर आमिरचा जीव थोडक्यात बचावला आहे. एक स्टंट करत असताना आमिरचा मोठा अपघात होता होता राहिला.
थोडक्यात वाचले आमिरचे प्राण
गुलाम या सिनेमामध्ये आमिरचा रेल्वे ट्रॅकवरचा एक सीन होता. या सीनमध्ये त्याला रेल्वे ट्रेन समोर झेंडा घेऊन धावायचं होतं. आणि, रेल्वे गाडी जवळ येण्यापूर्वी त्याला ट्रॅकवरुन उडी मारुन बाजूला व्हायचं होतं. हा सीन सानपाडा रेल्वे स्टेशनवर शूट होत होता. परंतु, हा सीन परफेक्ट व्हावा यासाठी आमिरने डबल बॉडी वापरण्यास नकार दिला आणि स्वत: सीन करण्यास उभा राहिला. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटलं आणि आमिर रेल्वे ट्रॅकवर धावू लागला. परंतु, तो धावत असताना गाडी त्याच्या इतकी जवळ आली की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. १.२ सेकंदांच्या फरकाने आमिरचा जीव वाचला नाही तर आमिरचा मोठा अपघात झाला असता. हा सीन झाल्यानंतर काही काळ आमिरही स्तब्ध झाला होता.
दरम्यान, त्या काळी VFX वा अॅनिमेशनचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे हे स्टंट एक तर कलाकार किंवा त्यांचे डबल बॉडी यांनाच करावे लागत होते. परंतु, जीवाची बाजी लावत आमिरने केलेला हा सीन चांगलाच गाजला. १९९८ मध्ये आमिरचा गुलाम रिलीज झाला. या सिनेमात त्याच्यासोबत राणी मुखर्जीने स्क्रिन शेअर केली होती.