Aamir Khan : ध्यानधारणा करण्यासाठी आमिर खान गेला थेट देशाबाहेर, "सिनेमाच्या अपयशामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 11:48 IST2023-05-08T11:48:14+5:302023-05-08T11:48:50+5:30
तो मेडिटेशनसाठी विपश्यना केंद्राकडे रवाना झाला.

Aamir Khan : ध्यानधारणा करण्यासाठी आमिर खान गेला थेट देशाबाहेर, "सिनेमाच्या अपयशामुळे..."
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan ) काही काळापासून चित्रपटांमधून गायब आहे. याचं कारणही तसंच आहे. 'लाल सिंह चड्डा' या सिनेमाकडून आमिक खानला खूप अपेक्षा होत्या, मात्र तो काही चालला नाही. याचा आमिरला धक्काच बसला तो इतका की त्याने सिनेमांमधून ब्रेक घेतला. आता आमिर विश्रांतीच्या काळात १० दिवस नेपाळला जाणार आहे. फिरण्यासाठी नाही तर ध्यानधारणा करण्यासाठी तो भारतातून बाहेर गेला आहे.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, आमिर खान काल ७ मे रोजी काठमांडू येथे दाखल झाला. तिथून तो मेडिटेशनसाठी विपश्यना केंद्राकडे रवाना झाला. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की तो मेडिटेशन सेंटरला गेला आहे. काठमांडूच्या बुढानिलकण्ठ विपश्यना सेंटरमध्ये तो कमीत कमी १० दिवस राहणार आहे. हे सेंटर शहरापासून बरंच दूर आहे. हा १० दिवसांचा मेडिटेशन कोर्स आहे.
आमिरने लाल सिंह चड्डानंतर सिनेमांमधून ब्रेक घेतला. मात्र तो फिल्म निर्मिती करणार आहे. सध्या तो आयएस प्रसन्ना यांची फिल्म 'चॅम्पियन'ची निर्मिती करत आहे जो स्पॅनिश फिल्मचा हिंदी रिमेक असणार आहे. याशिवाय 'गजनी' सिनेमाच्या भाग २ चीही चर्चा आहे.