RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 12:39 PM2020-11-28T12:39:25+5:302020-11-28T12:40:06+5:30

अभिनेता आमिर खान आणि चिरंजीवी आता एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआरशी जोडले जाणार आहेत.

Aamir Khan will not be acting in RRR movie, but it will be a big responsibility | RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी

RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि चिरंजीवी आता एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआरशी जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे या सिनेमात अभिनय नाही तर एक वेगळीच भूमिका साकारताना दिसणार आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि चिरंजीवी आरआरआर चित्रपटात अभिनय करताना दिसणार नाहीत. पण ते या चित्रपटात सूत्रधाराची म्हणजेच स्टोरी टेलरची जबाबदारी सांभाळणार आहेत. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चिरंजीवी या सिनेमाच्या तेलुगू व्हर्जनसाठी सूत्रधाराची भूमिका निभावणार आहे, तर आमिर खान हिंदी व्हर्जनमध्ये सिनेमातील पात्रांची ओळख करून देणार आहे. 


डिव्हीव्ही दानय्या निर्मित आरआरआर चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये मकर संक्रात दिवशी प्रदर्शित केला जाणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर याच्या रिलीजबाबत घोषणा केली जाणार आहे.


मोठ्या ब्रेकनंतर ऑक्टोबरमध्ये या चित्रपपटाच्या शूटिंगला हैदराबादमध्ये सुरूवात झाली आहे. ज्युनिअर एनटीआर शिवाय या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट आणि समुथिरकानी मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण आणि आलिया भट या चित्रपटातून तेलगूमध्ये पदार्पण करणार आहेत. यामध्ये श्रीया सरन फ्लॅशबॅक सीनमध्ये अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

आरआरआर हा चित्रपट अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन लोकप्रिय क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित आहे. यात राम चरण अल्लूरी सीताराम राजू यांच्या तर एनटीआर भीम यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Aamir Khan will not be acting in RRR movie, but it will be a big responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.