अभिनयातून संन्यास घेऊन आमिर खान करणार हे काम, स्वत: केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 10:08 AM2019-03-17T10:08:41+5:302019-03-17T11:15:22+5:30

आमिर खानने नुकतीच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. आता आमिरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

aamir khan will quit acting become full time director | अभिनयातून संन्यास घेऊन आमिर खान करणार हे काम, स्वत: केला खुलासा!!

अभिनयातून संन्यास घेऊन आमिर खान करणार हे काम, स्वत: केला खुलासा!!

googlenewsNext
ठळक मुद्देलीकडे आमिरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव असेल, ‘लाल सिंग चड्ढा’.

आमिर खानने नुकतीच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. आता आमिरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. होय, आमिरच्या मनात अभिनयातून संन्यास घेण्याचे विचार घोळू लागले आहेत. खुद्द आमिरने एका ताज्या मुलाखतीत हा विचार बोलून दाखवला.
मी अभिनयातून संन्यास घेऊन अन्य क्षेत्रात माझे नशीब आजमावू इच्छितो, असे त्याने सांगितले. हे अन्य क्षेत्र कुठले? असे विचारले असता, दिग्दर्शन क्षेत्र असे उत्तर त्याने दिले. अभिनयापेक्षा मी  दिग्दर्शनाबद्दल अधिक उत्साहित असतो. पण याचा अर्थ मला अभिनय कमी अन् दिग्दर्शन अधिक आवडते, असे नाही. या दोन्ही गोष्टी मला आवडतात.  पण ज्या दिवशी मी अभिनयातून संन्यास घेईल, त्यादिवसापासून मी पूर्णवेळ दिग्दर्शन करेल.  सध्या मी केवळ आणि केवळ अभिनयावर लक्ष केंद्रीत करू इच्छितो. तूर्तास अ‍ॅक्टिंग सोडण्याचा माझा विचार नाही, असे आमिर म्हणाला.अलीकडे आमिरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव असेल, ‘लाल सिंग चड्ढा’. आमिरचा आगामी चित्रपट हा एका आॅस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असेल. या आॅस्कर विजेत्या चित्रपटाचे नाव आहे, ‘फॉरेस्ट गम्प’.


 आमिरचे मानाल तर, पैसा कमवणे हा आमिरचा उद्देश नाहीच. म्हणूनच जोपर्यंत मनासारखी स्क्रिप्ट मिळत नाही तो चित्रपट करत नाही.  


१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आॅस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. आणखी एक खास सरप्राईज म्हणजे, यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे. 

Web Title: aamir khan will quit acting become full time director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.