Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:08 PM2022-08-23T18:08:26+5:302022-08-23T18:09:08+5:30

'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान'च्या चार वर्षानंतर आमिरचा चित्रपट आला होता, पण चित्रपटाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे.

Aamir Khan will take 2 months break and would go to America | Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..!

Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..!

googlenewsNext


Aamir Khan: आमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला मोठा फटका बसला, ज्यामुळे चित्रपटाला 60 कोटींचा टप्पाही पार करता आला नाही. चित्रपटाच्या अपयशामुळे आमिरला मोठा धक्का बसला असून, त्याने आता दोन महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन महिन्यात तो अमेरिकेत राहील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी आमिरला स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे, ज्यासाठी तो अमेरिकेत सुट्टीचा आनंद लुटणार आहे. या दोन महिन्यात तो स्वतःवर वेळ खर्च करेल. याशिवाय, 'लाल सिंह चड्ढा'ला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचाही विचार करणार असल्याचे म्हटले जात आहे.

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडचा हिट चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक होता. यात करीना कपूरशिवाय साऊथ स्टार नागा चैतन्यनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत दोन आठवड्यात चित्रपटाने केवळ 56 कोटी रुपये कमवले आहेत.

पुढील चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असेल
आमिर खानचा पुढील चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असेल, ज्याचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना करणार आहेत. प्रसन्नाने 'शुभ मंगल झ्यादा सावधान'चे दिग्दर्शन केले आहे. आमिरचा आगामी चित्रपट 2018 मध्ये आलेल्या 'कॅम्पिओन' या स्पॅनिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पॅनिश चित्रपटाला त्या वर्षी ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते आणि तो देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

Web Title: Aamir Khan will take 2 months break and would go to America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.