अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनला दरवर्षी पत्र लिहितो आमिर खान, जाणून घ्या या मागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:06 AM2021-01-15T11:06:07+5:302021-01-15T11:06:39+5:30
श्वेता बच्चन नंदा ही लाइम लाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चर्चेत येत असते.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही लाइम लाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चर्चेत येत असते. बॉलिवूडमध्ये ती सक्रिय नसली तरी ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानआणिसलमान खान या दोन अभिनेत्यांची मोठी फॅन आहे. याबाबत नुकतेच अभिषेक बच्चन याने खुलासा केला आहे. याबाबत आमिर खानला जेव्हा कळले तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे अभिषेकने सांगितले आहे.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ज्यावेळी सलमान खानचा 'मैंने प्यार किया' चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ऐकायची. याचबरोबर सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने अभिषेक बच्चनकडून फ्रेंड लिहिलेली कॅप देखील मागितली असल्याची माहिती अभिषेक बच्चन याने या शोमध्ये दिली होती. यावेळी श्वेता हिनेदेखील आम्हाला चित्रपट पाहण्यास बंदी असल्याने मी हा चित्रपट रेकॉर्ड करून पाहिल्याचे सांगितले. ती सलमानची मोठी चाहती असल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.
यासोबतच आमिर खानची देखील फॅन असल्याचे तिने या कार्यक्रमात सांगितले. यावेळी अभिषेकने सांगितले की, श्वेता आमिर खानची देखील चाहती होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा. आमिर खान आणि श्वेता बच्चन यांचा वाढदिवस लागोपाठ असल्याने तो मला पत्र लिहीत असावा हे देखील एक कारण तिने यावेळी सांगितले.
आमिर खानचा वाढदिवस १४ मार्चला आणि श्वेता बच्चन हिचा वाढदिवस १७ मार्चला असतो.
अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तो ब्रीदः इन द शॅडो या वेबसीरिजमध्ये झळकला होता. त्यानंतर आता तो बिग बुल चित्रपटात दिसणार आहे.यामध्ये त्याच्यासोबत चंकी पांडे आणि इलियाना डिक्रुझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.