आमिर खानची मुलगी इरा 4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- कळतं नव्हतं काय करु
By गीतांजली | Updated: October 12, 2020 15:52 IST2020-10-12T15:43:19+5:302020-10-12T15:52:04+5:30
इराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ती चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितलं आहे.

आमिर खानची मुलगी इरा 4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, व्हिडीओ शेअर करत म्हणाली- कळतं नव्हतं काय करु
आमिर खानची मुलगी इरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इराने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे त्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. इराने या व्हिडीओत गेल्या चार वर्षांपासून ती डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगतेय.
इरा 4 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये
या व्हिडीओत इरा म्हणतेय, ''मी जवळपास 4 वर्षे डिप्रेशनमध्ये आहे. यातून बाहेर येण्यासाठी मी डॉक्टरांकडे गेले होते. आता मला पूर्वीपेक्षा बरं वाटते आहे. मला गेल्या वर्षभरापासून मेंटल हेल्थसाठी काहीतरी करायचे होते, पण कळतं नव्हते की काय आणि कसं करु?
पुढे इरा सांगते, ''मी कोणत्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये आहे?, माझ्याकडे तर सगळं काही आहे ना ?.. या व्हिडीओला शेअर करताना इराने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आयुष्यात खूप काही घडतंय. अनेक लोकांना खूप काही बोलायचं असते. वास्तविक बर्याच गोष्टी साधारण आणि ठीक असतात पण तरीही सर्व काही ठीक नसतात. मला वाटते की मला काहीतरी सापडले आहे किंवा मिळत आहे ज्यामुळे मला ते थोडेस समजले आहे. माझ्या या प्रवासात सामील व्हा. कधीकधी लहान मुलाप्रमाणे, कधीकधी विचित्रप्रमाणे संवाद सुरु करुया.'' इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं.
आमिर खानची मुलगी इरा खानला मिळाला आणखी एक करिअर ऑप्शन, फोटो शेअर करत चाहत्यांनाच विचारला प्रश्न