नऊवारी साडी, केसांत गजरा अन्...; आयराच्या हळदीसाठी आमिरची एक्स पत्नी किरण रावचा मराठमोळा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 15:32 IST2024-01-02T15:31:49+5:302024-01-02T15:32:39+5:30
आमिर खान(Aamir Khan)ची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्नगाठ बांधणार आहे.

नऊवारी साडी, केसांत गजरा अन्...; आयराच्या हळदीसाठी आमिरची एक्स पत्नी किरण रावचा मराठमोळा लूक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरे(Nupur Shikhare)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या त्यांच्याकडे जोरदार तयारी सुरू आहे. आज त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरूवात देखील झाली आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जिथे आमिर खानचे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन लग्नाच्या तयारीला लागले आहेत.
आमिर खानची एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता देखील आयराच्या लग्नासाठी एकत्र दिसल्या. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओंमध्ये किरण राव कारमधून सामान बाहेर काढताना दिसत आहे.
तर, आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताही हिरव्या रंगाच्या साडीत घराबाहेर पडताना दिसल्या. यादरम्यान त्यांनी त्यांचा होणारा जावई नुपूरसोबत क्लिक केलेले फोटोही पाहायला मिळाले. रीना दत्ता यांचे घरही फुलांनी सजलेले दिसले. मात्र, या काळात आमिर खान कुठे दिसला नाही.
उद्या बांधणार लग्नगाठ
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे उद्या ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नानंतर आमिर खान मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन देणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.