आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'नं रिलीजच्या आधीच कमावले इतके कोटी, जाणून घ्या कसे ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 06:16 PM2022-08-15T18:16:16+5:302022-08-15T18:16:48+5:30

Aamir Khan's Laal Singh Chaddha Movie : आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ३७.९६ कोटींची कमाई केली आहे.

Aamir Khan's 'Laal Singh Chadha' earned so many crores before its release, know how? | आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'नं रिलीजच्या आधीच कमावले इतके कोटी, जाणून घ्या कसे ते?

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'नं रिलीजच्या आधीच कमावले इतके कोटी, जाणून घ्या कसे ते?

googlenewsNext

आमिर खान(Aamir Khan)चा लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा सिनेमा ११ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ३७.९६ कोटींची कमाई केली आहे. ज्या प्रकारची बंपर कमाई अपेक्षित होती, 'लाल सिंग चड्ढा' त्या निकषावर टिकू शकला नाही. असो, सध्या बॉलिवूडचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नाहीयेत. पण या सगळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्म बॉलिवूड चित्रपटांसाठी तारणहार म्हणून उदयास येत आहे. मोठमोठे चित्रपट भरमसाट किमतीत विकत घेऊन हे व्यासपीठ एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. असेच काहीसे आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाबाबतही बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' OTT प्लॅटफॉर्म Netflix ने विकत घेतला आहे. तथापि, प्लॅटफॉर्मने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. पण असे सांगितले जात आहे की रिलीज होण्यापूर्वीच या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट १६० कोटी रुपयांना विकला गेला होता. जर हा रिपोर्ट बरोबर असेल तर आमिर खानला त्याचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठी रक्कम मिळाली आहे.

'लाल सिंह चड्ढा'च्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाचे बजेट १८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे हा अहवाल योग्य असेल तर चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा देणारी बातमी आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Aamir Khan's 'Laal Singh Chadha' earned so many crores before its release, know how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.