आमिर खानच्या एका चुकीमुळे पालटलं सैफ अली खानचं नशीब, रातोरात झाला स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:12 PM2023-08-18T17:12:31+5:302023-08-18T17:13:05+5:30

Aamir Khan And Saif Ali Khan : आमिर खानने नाकारलेल्या या चित्रपटातून सैफ अली खान एका रात्रीत स्टार झाला होता.

Aamir Khan's mistake changed the fate of Saif Ali Khan, he became a star overnight | आमिर खानच्या एका चुकीमुळे पालटलं सैफ अली खानचं नशीब, रातोरात झाला स्टार

आमिर खानच्या एका चुकीमुळे पालटलं सैफ अली खानचं नशीब, रातोरात झाला स्टार

googlenewsNext

निर्माते जेव्हा चित्रपट तयार करतात तेव्हा ते त्यांच्या आवडत्या स्टारला डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करतात. परंतु अनेकदा असे घडते की, अभिनेता चित्रपटात काम करण्यास नकार देतो, अशावेळी नंतर चित्रपटाची ऑफर दुसऱ्या अभिनेत्याला दिली जाते. २००४ मध्ये आलेल्या 'हम तुम' चित्रपटाबाबतही असेच घडले होते. यापूर्वी हा चित्रपट आमिर खान(Aamir Khan)ला ऑफर करण्यात आला होता. पण नंतर हा चित्रपट सैफ ​​अली खान(Saif Ali Khan)कडे गेला.

राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि ऋषी कपूर अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी या चित्रपटातून वेगळ्या संकल्पनेतून चित्रपट तयार केला होता. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'हम तुम' या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि ऋषी कपूर हे तिन्ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ७.२ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ४२.६ कोटींची कमाई करून निर्मात्यांना श्रीमंत केले.

'हम तुम'साठी राणी मुखर्जीने घेतली होती खूप मेहनत
या चित्रपटाचा भाग होण्यापूर्वी राणी मुखर्जीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. पण या छोट्या बजेटच्या चित्रपटातही अभिनेत्रीने तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती. राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला हा पहिलाच चित्रपट होता. त्या काळात कुणाल कोहलीने रोमँटिक कॉमेडी करण्याचा धोका पत्करला. आजही निर्माते इंडस्ट्रीत या प्रकारचा चित्रपट बनवण्यास कचरत असताना, हम तुम या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटाने नवा बदल घडवून आणला आणि या चित्रपटाच्या यशानंतरच लोकांनी रोमँटिक कॉमेडी बनवण्यास सुरुवात केली. या चित्रपटातील कार्टून अॅनिमेशनही खूप आवडले. यानंतर 'जब वी मेट' सारख्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले.

आमिर खान होती पहिली पसंती
चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाची स्क्रिप्ट संपताच त्यांनी राणी मुखर्जीला चित्रपटासाठी फायनल केले होते. या चित्रपटासाठी आमिर पहिली पसंती होता. मात्र दोघांनीही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यानंतर मी या चित्रपटासाठी सैफ अली खानशी संपर्क साधला आणि त्याने या चित्रपटासाठी होकार दिला. सैफ नसता तर कदाचित हा चित्रपट झाला नसता.

आधी ऋषी कपूर यांनी दिला होता नकार
या चित्रपटात ऋषी कपूर यांना कास्ट करण्याबाबतही दिग्दर्शकाने खुलासा केला होता आणि सांगितले होते की जेव्हा त्यांनी हा चित्रपट त्यांच्याकडे नेला तेव्हा त्यांच्याकडे चित्रपटात फक्त काही दृश्ये होती आणि त्यांनी चित्रपटात काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांना मोठ्या सिनेमात काम करायला आवडतं पण ज्या चित्रपटात त्यांचे सीन नाहीत अशा चित्रपटात ते काम करत नाहीत. पण जेव्हा मी त्यांना प्रत्येक सीन वाचून दाखवला तेव्हा त्यांना स्क्रिप्ट इतकी आवडली की त्यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला.

कुणाल कोहली आणि सैफ अली खानमध्ये झाले होते मतभेद
शूटिंगदरम्यान कुणाल कोहली आणि सैफ अली खान यांच्यात काही मतभेद झाले होते. त्यादरम्यान ऋषी कपूर यांनी दोघांनाही समजावून सांगितले आणि तुम्ही दोघांनीही कामानुसार विचार करा, असे सांगितले. यानंतर दोघांच्या बाँडिंगमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर सैफ अली खान रातोरात स्टार झाला. 

Web Title: Aamir Khan's mistake changed the fate of Saif Ali Khan, he became a star overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.