आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान आणि अवंतिकाचा घटस्फोट?, पत्नीने शेअर केली पोस्ट; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:09 IST2023-03-22T16:09:24+5:302023-03-22T16:09:49+5:30
Imran Khan-Avantika Malik: अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान गेल्या काही काळापासून पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळे राहत आहे. ...

आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान आणि अवंतिकाचा घटस्फोट?, पत्नीने शेअर केली पोस्ट; म्हणाली...
Imran Khan-Avantika Malik: अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान गेल्या काही काळापासून पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळे राहत आहे. दोघेही बालपणीचे मित्र आहेत. मात्र काही काळापासून दोघांमध्ये काही चांगले चालले नाही. अवंतिका आणि इमरान वेगळे राहत होते, असे सांगण्यात येत आहे. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. खरंतर अवंतिका मलिकने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
अवंतिका मलिकने इंस्टाग्राम स्टोरीवर मायली सायरसचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर तिने गाण्यावर कॅप्शनमध्ये लिहिले की घटस्फोट त्यांच्यासाठी सर्वोत्तम होता. हे लिहिल्यानंतर अवंतिका म्हणाली की, मी असंच बोलत आहे. मात्र, चाहत्यांनी तिची ही पोस्ट तिच्या आयुष्याशी जोडून पाहिली आणि त्यानंतर इमरान आणि अवंतिका यांच्या घटस्फोटाचे वृत्त येऊ लागले.
इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ते एकमेकांपासून वेगळे होण्याबाबत काहीही बोललेले नाहीत. सध्या हा केवळ अंदाज आहे. एका यूजरने तर लिहिलं आहे की, आयुष्य विष बनण्यापेक्षा माणूस वेगळे होणे चांगले. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, आता ते वेगळे होणार आहेत असे दिसते. काहींनी तर लेखा वॉशिंग्टनचे नावही घेतले.
२०२१ मध्ये इमरान खानचे दक्षिण अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या बातम्या आल्या होत्या. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, दोघे खूप दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. हे पाहून दोघांचे कथित अफेअर असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
इमरान हाश्मीचे लेडी लव्ह!
लेडी लव्ह लेखा वॉशिंग्टनच्या जवळ असलेले पाली हिल येथे इमरानने घर भाड्याने घेतल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. दोघेही एकमेकांच्या घरी येत-जात राहतात, असे सांगण्यात आले.