​आमिर खानच्या ‘पगडी लूक’चे खरे रूप आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 07:17 AM2017-02-26T07:17:29+5:302017-02-26T19:44:50+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्यावर भर देतो. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटातून महिला ...

Aamir Khan's 'Pagdi Look' came in the true form of the front | ​आमिर खानच्या ‘पगडी लूक’चे खरे रूप आले समोर

​आमिर खानच्या ‘पगडी लूक’चे खरे रूप आले समोर

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्यावर भर देतो. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ या चित्रपटातून महिला सशक्तीकरणाचा मुद्दा मांडणारा आमिर खान एका लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारीने केले आहे. आतापर्यंत चर्चिला जाणारा आमीरचा पगडी लुकचे रहस्य समोर आले आहे.
‘दंगल’च्या यशानंतर नितेश तिवारीने आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या लघुपटाच्या निमित्ताने ती पूर्ण झाली आहे. आमिर व नितेश तिवारी एका ब्रँड फिल्मसाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा आधार महिला सशक्तीकरण असल्याचे दिसते. या लघुपटाच्या माध्यमातून देशात लैंगिक आधारावर सामाजात रुढ असलेल्या असमानतेवर प्रकाश टाकला आहे. हा लघुपट स्टार प्लस या वाहिनीच्या ‘नई सोच’ या अभियानाचा भाग असणार आहे. 

५० सेंकदाच्या या लघुपटात आमिर खान एका लहान शहरातील मध्यमवर्गीय विचार असलेल्या वडिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात आमिर खान अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो की त्याचा स्थिरावलेला व्यवसाय त्याच्या पश्चात त्याच्या मुली पुढे घेऊन जातील. या अभियानाची प्रशंसा करताना आमिर म्हणाला, या चित्रपटातून आम्ही अशा सर्व वडिलांचे आभार मानण्याचा प्रयत्न करीत आहोत जे सामाजिक व लैंगिक बदलासाठी एखाद्या दिव्या प्रमाणे आहेत. मला या लघुपटात काम करण्याची संधी मिळाली यासाठी त्याने आभार मानले आहेत. 

मागील काही दिवसांपासून आमिर खानचा पडगी लूक व्हायरल होत आहे. हा लूक ‘ठग्स आॅफ हिंदोस्ता’मधील असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आमिरचा व्हायरल झालेला लूक ठग्स मधला नाही असे सांगण्यात आले होते. आता या लूकचा खुलासा झाला असून हा लूक नई सोच मधील लघुपटाचा आहे. यात तो एका मिठाई व्यवसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिरने शनिवारी रात्री आपल्या अधिकृत ट्विटर हँटलवरून या लघुपटाला रिलीज केले. आमिर खानचा दंगल हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पाकिस्तानात तर या दंगलचे नाटकीय रुपांतरण करण्यात आल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. 

Shooon Te Shaaan. #NayiSoch
Love. a. pic.twitter.com/WiXnFr0yFb

— Aamir Khan (@aamir_khan) February 25, 2017

Web Title: Aamir Khan's 'Pagdi Look' came in the true form of the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.