आमिर खानच्या ‘दंगल’ने चीनमध्ये दोनच दिवसांत केली ३० लाख डॉलरची कमाई!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2017 04:24 PM2017-05-06T16:24:50+5:302017-05-06T21:54:50+5:30
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमिर खान याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने भारताप्रमाणेच चीनमध्येही ‘दंगल’ केली आहे. चित्रपटाने दोनच दिवसांत ...
म स्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमिर खान याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने भारताप्रमाणेच चीनमध्येही ‘दंगल’ केली आहे. चित्रपटाने दोनच दिवसांत ३० लाख डॉलरची कमाई केली असून, चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दंगल हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
गेल्या शनिवारी रिलीज झालेल्या ‘दंगल’ची दोन दिवसांतील ही कमाई अनेकांना आश्चर्यचकीत करणारी आहे. त्याचबरोबर चीनमध्ये आमिरची लोकप्रियताही अधोरेखित करणारी आहे. याअगोदर आमिरच्याच ‘पीके’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांनी चीनमध्ये सर्वाधिक कमाई केली होती. १६ दिवसांत ‘पीके’च्या नावे शंभर कोटी रुपयांच्या कमाईची नोंद झाली होती. आता पीकेचा हा रेकॉर्ड
‘दंगल’ सहजपणे तोडणार हे निश्चित मानले जात आहे.
चीनमध्ये ‘दंगल’ला ‘शुआई जिआओ बाबा’ या नावाने रिलीज करण्यात आले. हा चित्रपट बघण्यासाठी आमिरचे चिनी फॅन्स सध्या थिएटर्समध्ये अक्षरश: गर्दी करीत आहेत. निर्मात्यांनी सांगितले की, ‘दंगल’ चीनमध्ये नऊ हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला. मात्र विश्लेषकांनुसार ‘दंगल’ देशातील ४० हजार स्क्रीन्सपैकी केवळ सातच हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे.
दरम्यान, दंगलने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. कमाईच्या बाबतीत क्रमांक एकचा चित्रपट म्हणून दंगलकडे बघितले जात होते. आता चीनमध्येही हा चित्रपट करिष्मा करीत असल्याने आमिर खूश आहे. चीनमध्ये दंगलच्या प्रचारासाठी स्वत: आमिर मैदानात उतरला होता.