आमिर खानचा मुलगा जुनैदनं या दोन सिनेमासाठी दिलं होतं ऑडिशन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:22 IST2025-01-06T11:21:46+5:302025-01-06T11:22:22+5:30

Junaid Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा मुलगा जुनैद खानने गेल्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'महाराज' या चित्रपटातून पदार्पण केले.

Aamir Khan's son Junaid auditioned for these two films, but... | आमिर खानचा मुलगा जुनैदनं या दोन सिनेमासाठी दिलं होतं ऑडिशन, पण...

आमिर खानचा मुलगा जुनैदनं या दोन सिनेमासाठी दिलं होतं ऑडिशन, पण...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान(Aamir Khan)चा मुलगा जुनैद खान(Junaid Khan)ने गेल्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'महाराज' (Maharaj Movie) या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि आता तो लवकरच खुशी कपूरसोबत 'लव्हयापा'मध्ये दिसणार आहे. जुनैदचे 'महाराज' चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक केले. पण किरण रावच्या 'लापता लेडीज' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याने ऑडिशन दिले, पण त्याची निवड झाली नाही.

होय, अलीकडेच विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत जुनैदने या ऑडिशनबद्दल सांगितले. स्पर्श श्रीवास्तवला ही भूमिका कशी मिळाली हे त्याने सांगितले. जुनैदने वडिलांच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटासाठी ऑडिशनही दिले होते. जुनैद म्हणाला की, 'तुम्ही मला 'लाल सिंग चड्ढा'मध्ये पाहिले असेल, कारण मी किरण रावसोबत टेस्ट दिली होती. तिने माझ्या आईची भूमिका साकारली होती. आम्ही ७-८ दृश्ये शूट केली, जे सुमारे २० मिनिटांचे फुटेज होते.

'लाल सिंग चड्ढा'साठी दिली होती ऑडिशन
तो पुढे म्हणाला, ''माझ्यासाठी ही परीक्षा होती. बाबांना मी या गोष्टीला कसे सामोरे जातो ते पाहायचे होते. पण विशेषतः बजेटमुळे हे शक्य झाले नाही. नवीन कलाकार घेणे खूप महागात पडले असते.'' या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसला होता आणि हा चित्रपट १९९४ मध्ये आलेल्या अमेरिकन चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे, ज्यामध्ये टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला. या चित्रपटात करीना कपूर खान देखील होती.

'लापता लेडीज'साठीही दिलेली ऑडिशन
'लापता लेडीज'च्या ऑडिशनबद्दल बोलताना जुनैद म्हणाला, 'मी स्क्रीन टेस्ट दिली हा एक वेगळा अनुभव होता, पण किरण म्हणाली की स्पर्श श्रीवास्तव या भूमिकेसाठी अधिक चांगला आहे आणि मी याच्याशी सहमत आहे. या भूमिकेसाठी तो अधिक योग्य होता. जुनैदला चित्रपटात कास्ट करण्यात आले नव्हते, पण त्याचा आणि किरणच्या नात्यावर त्याचा परिणाम झाला नसल्याचे त्याने सांगितले. त्याने किरणला एक मजेशीर व्यक्ती म्हटले. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी केली होती.

'लापता लेडीज'बद्दल
लापता लेडीज हा चित्रपट दोन नवविवाहित वधूंची कथा आहे, जे रेल्वे प्रवासादरम्यान एकमेकांच्या पतीच्या घरी पोहोचतात. नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन हे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. अतिशय साध्या शैलीत मांडण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली.

Web Title: Aamir Khan's son Junaid auditioned for these two films, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.