​आमिर कुणाला भेट देणार ‘शादी का जोडा’?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 04:34 PM2016-11-17T16:34:24+5:302016-11-17T16:34:24+5:30

आमिर खानचा ‘दंगल’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आलाय. ‘दंगल’ या सिनेमाचं कथानक कुस्तीपटू महावीर सिंह फोगाट आणि त्याच्या ...

Aamir will visit 'why marriage?' | ​आमिर कुणाला भेट देणार ‘शादी का जोडा’?

​आमिर कुणाला भेट देणार ‘शादी का जोडा’?

googlenewsNext
िर खानचा ‘दंगल’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आलाय. ‘दंगल’ या सिनेमाचं कथानक कुस्तीपटू महावीर सिंह फोगाट आणि त्याच्या दोन पहेलवान मुली गीता आणि बबिता  यांच्या ख-याखु-या आयुष्यावर बेतलेला आहे. महावीर सिंह यांचे आयुष्य निश्चितपणे प्रेरणादायी आहे. बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ मानल्या जाणाºया आमिरलाही महावीर सिंह यांच्या आयुष्याने प्रभावित केले. इतके की, केवळ त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात भूमिकाच नाही तर आता आमिर व फोगाट कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध स्थापित झाले आहेत. त्यामुळेच  आमिर महावीर यांची कन्या कुस्तीपटू गीता  हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. शिवाय तिला कधी नव्हे इतकी अप्रतिम आणि अविस्मरणीय भेटही देणार आहे. ही भेट म्हणजे ‘शादी का जोडा’.  होय, येत्या २० नोव्हेंबर गीता आणि कुस्तीपटू पवन कुमार दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. आमिरने भेट दिलेला ‘शादी का जोडा’ नेसून गीता बोहल्यावर चढेल.  
कुठल्याही मुलीला तिच्या वडिलांकडून ‘शादी का जोडा’ दिला जातो. आमिरने ‘दंगल’मध्ये गीताच्या वडिलांचीच भूमिका साकारली आहे. गत दोन वर्षांत गीता आणि बबिता या महावीर यांच्या दोन मुलींशी आमिरचे भावनिक नाते तयार झाले आहे. याच नात्याने गीतासाठी त्याने हे खास गिफ्ट प्लान केलेय. गीताच्या लग्नाच्या तयारीकडेही आमिर जातीने लक्ष देत असल्याचेही कळतेय. हे लग्न अगदी व्यवस्थित आणि थाटामाटात पार पडावे, अशी त्याची इच्छा आहे. 


 

Web Title: Aamir will visit 'why marriage?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.