आमिरचा आणखी एक सरप्राईज लूक !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2016 09:55 AM2016-05-21T09:55:38+5:302016-05-21T15:25:38+5:30

आपल्या सिनेमासाठी आणि भूमिकेसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निरनिराळे प्रयोग करतच असतो हे सा-यांनाच माहिती आहे. प्रत्येक सिनेमात काही ...

Aamir's surprise surprise! | आमिरचा आणखी एक सरप्राईज लूक !

आमिरचा आणखी एक सरप्राईज लूक !

googlenewsNext
dir="ltr">आपल्या सिनेमासाठी आणि भूमिकेसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निरनिराळे प्रयोग करतच असतो हे सा-यांनाच माहिती आहे. प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळं करण्याचा आमिरचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी तो बरीच मेहनत घेतो. आता असाच एक आमिरचा नवा लूक समोर आलाय. नव्या लूकमध्ये आमिर स्लीम झाल्याचं पाहायला मिळतंय.. या लूकला आमिरनं तितकंच सहज कॅरी केलंय. डोळ्यावर चष्मा आणि खास हेअरस्टाईल लक्षवेधी ठरतेय. काही दिवसांपूर्वी दंगल सिनेमातील कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. मात्र आता त्यानं आपलं 23 किलो वजन कमी केलंय. त्याचं वजन जवळपास 75 किलोवर आलं असून तो स्लीम दिसतोय. वजन कमी करण्यासाठी दररोज 6-7 तास तो व्यायाम करत घाम गाळतोय. आमिरनं आपल्यासाठी एक टार्गेट सेट केलंय. हे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर दंगल सिनेमाच्या पुढच्या भागाचं शूटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळं मिस्टर पर्फेक्शनिस्टचा हा नवा अवतार चर्चेचा विषय ठरलाय.
 


 

Web Title: Aamir's surprise surprise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.