#Aapjaisakoi : मलायका अरोराच्या 'आयटम सॉंग'वर पाकिस्तानी अभिनेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:47 PM2022-11-30T16:47:40+5:302022-11-30T16:50:56+5:30
आयुष्मान खुरानाच्या आगामी 'एन एक्शन हिरो' सिनेमात मलायका अरोराचे आयटम सॉंग असणार आहे. 'आप जैसा कोई ' या गाण्याचे ते रिमीक्स व्हर्जन आहे.
#Aapjaisakoi : आयुष्मान खुरानाच्या आगामी 'एन एक्शन हिरो' सिनेमातमलायका अरोराचे आयटम सॉंग असणार आहे. Iconic आयकॉनिक सॉंग 'आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आए' या गाण्याचे ते Remix रिमीक्स व्हर्जन असणार आहे. मात्र सगळे रिमीक्स वर्जन चांगले असतीलच असे नाही. आता हेच बघा मलायकाच्या या गाण्यावर थेट पाकिस्तानी अभिनेत्याने टीका केली आहे.
अदनान सिद्दीकी चे ट्विट
'आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए' हे गाणं आहे तसंच अनेकांना आवडतं. मात्र या गाण्याशी छेडछाड केलेली म्हणजेच त्याचे रिमीक्स बनवलेले लोकांना आवडलेले नाही. एवढेच काय अदनान सिद्दीकी या पाकिस्तानी अभिनेत्याने ट्विट करत या रिमीक्स गाण्यावर नाराजी दर्शवली आहे. त्याने लिहिले, 'लोकांच्या आवडीच्या जुन्या गाण्यांसोबत प्रयोग करुन त्याचे रिमीक्स बनवणे हे आजकाल काय सुरु आहे. रिमीक्स साठी सुद्धा टॅलेंटची गरज असते. नाजिया हसीन आज असत्या तर त्यांना देखील वाईट वाटले असते. आप जैसा कोई नही.अदनानने यापुर्वी पाकिस्तानी गाणी चोरणे आणि रिमेक केल्याप्रकरणी बॉलिवुडवर निशाणा साधला आहे.'
Is there something in the air that the world has suddenly developed a penchant for ruining perfect classics? Even re-creation requires talent. Nazia Hassan must be turning in her grave. #AapJaisaKoi nahi..
— Adnan Siddiqui (@adnanactor) November 28, 2022
काय आहे हा वाद ?
'एन एक्शन हिरो' या पिक्चरमधील आप जैसा कोई हे गाणं जहराह एसखान आणि आल्तमश फरीदी यांनी गायले आहे. हे गाणे तनिष्क बागची आणि इंडीवार यांनी लिहिले आहे. हे मूळ गाणं 'कुर्बानी' या सिनेमातील आहे. गायिका नाजिया हसन यांनी ओरिजिनल गाणे गायले आहे.
'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल
२००० साली नाजिया यांचे निधन झाले. नाजिया आपल्यात नसल्या तरी त्यांचे सदाबहार गीत आजही आपण ऐकत आहोत. तेव्हाच त्यांच्या या आयकॉनिक गाण्याचे रिमीक्स चाहत्यांना फारसे रुचले नाही.