'आई, तू अद्भूत आहेस...' आराध्या बच्चनने ऐश्वर्यासाठी दिलं खास स्पीच, चाहतेही भारावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:51 AM2023-11-02T10:51:26+5:302023-11-02T10:52:50+5:30

बॉलिवूडची दिवा ऐश्वर्या रायला वाढदिवसाला लेक आराध्याकडून खास सरप्राईजच मिळालं.

Aaradhya Bachchan gave speech for mother Aishwarya Rai on her 50 th birthday | 'आई, तू अद्भूत आहेस...' आराध्या बच्चनने ऐश्वर्यासाठी दिलं खास स्पीच, चाहतेही भारावले

'आई, तू अद्भूत आहेस...' आराध्या बच्चनने ऐश्वर्यासाठी दिलं खास स्पीच, चाहतेही भारावले

Aaradhya Bachchan speech: विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan)  काल 50 वा वाढदिवस होता. आई वृंदा राय आणि लेक आराध्यासह तिने वाढदिवस साजरा केला. एका इव्हेंटसाठी या तिघी आल्या असतानाच ऐश्वर्याचा वाढदिवसही तिथे साजरा करण्यात आला. माय लेकीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसंच छोट्या आराध्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. एवढीशी आराध्या आता अगदी ऐश्वर्याच्या उंचीची दिसत आहेत. तसंच तिने आईसाठी दिलेलं स्पीच व्हायरल होतंय. आराध्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलिवूडची दिवा ऐश्वर्या रायला वाढदिवसाला लेक आराध्याकडून खास सरप्राईजच मिळालं. आराध्याने स्टेजवर येत आईसाठी खास स्पीच दिलं. सगळ्यांसमोर आराध्याला बोलताना पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. एवढ्या लहान वयातही तिने खूप छान स्पीच दिलं. हे पाहून ऐश्वर्याही खूश झाली. इतक्या कमी वयात आराध्याचं भाषेवरचं प्रभूत्व, तिचे हावभाव सगळंच चाहत्यांना आवडलं. सोशल मीडियावर आराध्याचं खूप कौतुक होत आहे.  आराध्या म्हणाली, 'माझी प्रेमळ आई माझं आयुष्य आहे ती जे करतेय ते अद्भूत आहे. ती सर्वांची मदत करते. मला एवढंच सांगायचंय की आई तू जे करतेस ते अविश्वसनीय आहे.'

या इव्हेंटनंतर ऐश्वर्या आई आणि लेकीसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेली. तिथेही त्यांनी कॅमेऱ्यासमोर हसत हसत पोज दिली. आराध्या बच्चन सध्या १२ वर्षांची आहे. ती धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. अनेकदा आराध्याचे शाळेतील इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Web Title: Aaradhya Bachchan gave speech for mother Aishwarya Rai on her 50 th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.