आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:24 AM2024-09-27T10:24:25+5:302024-09-27T10:24:53+5:30

नुकतीच आराध्या आईसोबत पॅरिसला गेली होती. तर आता लगेच ती आयफा सोहळ्यासाठी अबूधाबीला रवाना झाली आहे.

Aaradhya Bachchan trolled as she spotted with Aishwarya went to Abu Dhabi to attend IIFA netizens ask no school | आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या जिथे जाते तिथे तिच्यासोबत लेक आराध्या (Aaradhya) असते. आराध्या आता चांगलीच मोठी आणि उंच झालेली दिसत आहे. अनेकदा आराध्याचं तिच्यावरील संस्कार पाहून कौतुक होतं. मात्र ती कधी शाळेत जात नाही का? म्हणत तिला ट्रोलही केलं जातं. नुकतीच आराध्या आईसोबत पॅरिसला गेली होती. तर आता लगेच ती आयफा सोहळ्यासाठी अबूधाबीला रवाना झाली आहे. आराध्या शाळेत कधी जाते? असा प्रश्नच नेटकऱ्यांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याला दुबईत झालेल्या दाक्षिणात्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण होतं. ऐश्वर्याला 'पोन्नियन सेल्वन' सिनेमासाठी अवॉर्डही मिळाला. यावेळी तिच्यासोबत आराध्याही होती. मायलेकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर आता दोनच दिवसांपूर्वी आराध्या आईसोबत पॅरिसवरुन परत आली. ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. हे होत नाही तोच आता आराध्या आईसोबत अबू धाबीला रवाना झाली आहे. तिथे IIFA 2024 सोहळा पार पडणार आहे. मायलेकीचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होतोय.


हे पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आधी आराध्या हेअरस्टाईलमुळे ट्रोल होत होती आता शाळेत जात नाही का वरुन  ट्रोल होत आहे. नेटकरी म्हणतात, 'ही शाळेत कधी जाते?' 'शाळेवाले काही बोलत नाही का?'.  

तसंच ऐश्वर्या आणि आराध्या या दोघीच नेहमी सोबत दिसतात. घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बरेच दिवसांपासून एकत्र दिसलेले नाहीत. तसंच ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबतही दिसत नाही. 

Web Title: Aaradhya Bachchan trolled as she spotted with Aishwarya went to Abu Dhabi to attend IIFA netizens ask no school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.