“राहुलला ब्रेन स्टोक आल्यानंतर सलमानने भरलेलं रुग्णालयाचं बिल”, ‘आशिकी’ फेम अभिनेत्याच्या बहिणीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 06:06 PM2023-07-15T18:06:09+5:302023-07-15T18:17:31+5:30
‘आशिकी’ फेम राहुल रॉयला २०२०मध्ये ब्रेन स्टोक आला होता. तेव्हा सलमान खानने रुग्णालयाचं बिल भरलं होतं, असा खुलासा अभिनेत्याच्या बहिणीने केला आहे.
१९९० साली प्रदर्शित झालेल्या आशिकी या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयला प्रसिद्धी मिळाली. दिलवाले कभी ना हारे, प्यार का साया, जानम यांसारख्या चित्रपटातील त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. २०२०मध्ये राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मदतीला धावून आल्याचं त्याच्या बहिणीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
लाइव्ह द बॅटल कारगिल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान २०२० साली राहुल रॉयला ब्रेन स्टोक आला होता. कारगिलमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तेथील हवामानामुळे राहुलला ब्रेन स्टोक आला आणि त्याची प्रकृती बिघडली. राहुलची बहीण प्रियंका रॉय यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने या कठीण काळात त्यांना मदत केल्याचा खुलासा केला. त्या म्हणाली, “मला सलमान खानचे आभार मानायचे आहेत. राहुल आजारी असताना हॉस्पिटलचं राहिलेलं बील त्याने फेब्रुवारीमध्ये भरलं होतं.”
"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा
“सलमान खानने राहुला फोन करुन काही मदत हवी आहे का असं विचारलं होतं. आणि त्याने खरोखरच मदत केली. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याचा मीडियासमोर एकदाही सलमानने उल्लेख केलेला नाही. त्याची ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. तुम्ही संकटात आहात का? असं कोणीतरी विचारणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणूनच तो आज स्टार आहे. फक्त कॅमेरासमोर स्टार होणं पुरेसं नाही,” असंही प्रियंका पुढे म्हणाल्या. “सलमान खानबाबत अनेक जण अनेक गोष्टी बोलतात. पण, माझ्यासाठी तो एक चांगला माणूस आहे,” असं राहुल रॉय म्हणाला.
‘जस्सी’ फेम मोना सिंहने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “मी ऑडिशन देण्यासाठी...”
ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर राहुलवर जवळील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्याला काही काळ आयसीयूमध्येही ठेवण्यात आलं होतं.