का आली सलमानचा जावई आयुष शर्मावर टायगर श्रॉफला कॉपी करण्याची वेळ? , जाणून घ्या या मागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:19 IST2019-01-29T17:12:02+5:302019-01-29T17:19:47+5:30
बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा त्याच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांना सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुषने त्याच्या आगामी सिनेमासाठी अंदाजे १०-१२ किलो वजन वाढवले आहे.

का आली सलमानचा जावई आयुष शर्मावर टायगर श्रॉफला कॉपी करण्याची वेळ? , जाणून घ्या या मागचे कारण
बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा त्याच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांना सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुषने त्याच्या आगामी सिनेमासाठी अंदाजे १०-१२ किलो वजन वाढवले आहे. त्याच्या या नव्या लूकला लोकांची पसंती मिळत आहे. आयुष हा टायगर श्रॉफचे ट्रेनर असलेल्या विक्रम स्वैनकडून ट्रेनिंग घेणार आहे. आयुषचे ट्रेनर विक्रम त्याला पुढील दोन सिनेमांसाठी ट्रेन करताना दिसेल. सध्या तो आहारावर नियंत्रण ठेवत असून व्यापक प्रशिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयुष दिवसातील २-३ तास व्यायाम करत आहे.
या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यासाठी आयुषला १६ किलो वजन वाढवायचे आहे. या चित्रपटात आयुष अॅक्शन अवतारात दिसणार आहे. निर्माती प्रेरणा अरोराचा आगामी चित्रपट एका गँगस्टरच्या आयुष्यावर आधारीत आहे. संजूबाबाबरोबरच आयुषही या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती अहमद खान व स्टुडिओ फाइव्ह एलिमेंट्स करणार आहेत. हा अंडरवर्ल्ड अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा सिनेमाच्या चित्रीकरणाला मे, २०१९मध्ये सुरूवात होणार आहे. आयुष शर्मा हा सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. २०१४ मध्ये अर्पिता व आयुषचे लग्न झाले होते. दोघांनाही २ वर्षांचा एक मुलगा आहे.