देओल ब्रदर्ससोबत काम करण्यास अभयचा नकार; बऱ्याच वर्षांनंतर खुद्द abhayनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:49 PM2021-11-11T17:49:35+5:302021-11-11T17:54:03+5:30
Abhay deol: अभयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु, आजपर्यंत त्याने धर्मेंद्र किंवा सनी-बॉबीसोबत एकाही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही.
बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) यांनी उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांची कुटुंबातील अर्ध्याहून अधिक जण बॉलिवूडमध्ये सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी (hema malini), मुलं बॉबी (bobby), सनी (sunny) आणि इशा देओल (esha) हेदेखील आज बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्स म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांचा भाचा अभय (abhay) देओलदेखील बॉलिवूडमध्ये सक्रीय असून तो काही निवडक चित्रपटांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही चित्रपटाची विचारपूर्वक निवड करणारा अभय, सनी आणि बॉबी देओलसोबत काम करण्याचं कटाक्षाने टाकतो. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्याने या मागचं कारण स्पष्ट केलं आहे.
'सोचा न था' या चित्रपटातून अभयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. परंतु, आजपर्यंत त्याने धर्मेंद्र किंवा सनी-बॉबीसोबत एकाही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही. नानू की जानू या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करताना त्याने या मागचं कारण सांगितलं.
"मला माझ्या कुटुंबातील व्यक्तींसोबत काम करायला निश्चितच आवडतं. मात्र, मी धर्मेंद्र किंवा माझ्या भावंडांसोबत योग्यरित्या काम करु शकेन याची मला खात्री नाही. त्यामुळे मी आजपर्यंत त्यांच्यासोबत काम केलेलं नाही. मी कोणत्याही प्रोजेक्टची निवड करताना खूप विचार करतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे जर येत्या काळात माझ्याकडे कोणता चांगला प्रोजेक्ट आला. आणि, त्यात जर मी माझ्या कुटुंबासोबत काम करावं अशी तुमची इच्छा असेल. तरीदेखील मी प्रथम चित्रपटाची स्क्रीप्ट पाहणं पसंत करेन. कारण, प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याकडे माझा कल आहे", असं अक्षय म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मी माझ्या काकांपुढे किंवा भावंडांसमोर अन्य कोणत्याही व्यक्तीचा अभिनय करु शकत नाही. त्यामुळे एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये जाऊन त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी कठीण आहे. जर मला एखाद्या वेळी काकांसमोर वरच्या आवाजात बोलायला सांगितलं. तर मी तो अभिनय कशा पद्धतीने करु शकेन हे मला माहित नाही. हीच माझी वैयक्तिक भीती आहे."
दरम्यान, अभय देओल याचं धर्मेंद्रसोबत खास नातं आहे. प्रत्यक्षात जरी ते काका-पुतणे असले तरीदेखील धर्मेंद्र त्याला सख्या मुलाप्रमाणे मानतात.