उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडिओवर अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "मुलीच त्यांच्या मागे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:56 IST2025-02-03T16:55:35+5:302025-02-03T16:56:36+5:30
उदित नारायण यांची काय चूक? अभिजीत भट्टाचार्य काय म्हणाले वाचा

उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडिओवर अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "मुलीच त्यांच्या मागे..."
९० च्या दशकात आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे गायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या चर्चेत आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल ज्यात ते एका चाहतीला चक्क लिपकिस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि उदित नारायण यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांनी यावर स्पष्टीकरणही देत स्वत:चाच बचाव केला आहे. माझं मन साफ असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आता त्यांचे मित्र गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीत भट्टाचार्य न्यूज १८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "उदित सुपरस्टार गायक आहेत. अशा प्रकारच्या घटना आम्हा गायकांसोबत अनेकदा होतच असतात. जर आम्हाला व्यवस्थित सुरक्षाव्यवस्था दिली नाही, आसपास बाऊन्सरच नसतील तर लोक आमचे कपडेही फाडू शकतात. माझ्यासोबत असं घडलं आहे."
ते पुढे म्हणाले, "मी इंडस्ट्रीत नवीन होतो आणि साऊथ आफ्रिकेत कॉन्सर्टसाठी गेलो होतो. तीन चार मुलींनी माझ्या गालावर किस केलं. तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकरही त्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. माझ्या गालावर लिपस्टिकचे वण दिसते होते त्यामुळे मी स्टेजवर जाऊ शकत नव्हतो. आता ते उदित नारायण आहेत. तरुणीच त्यांच्या मागे लागल्या. त्यांनी कोणालाच नाही बोलवलं. मला खात्री आहे की उदित नारायण परफॉर्म करत असताना त्यांची पत्नीही तिथे असते. त्यांना आपलं यश एन्जॉय करु द्या. उदित रोमँटिक गायक आहेत. ते मोठे खिलाडी आहेत आणि मी अनाडी आहे. कोणीही त्यांच्यासोबत पंगा घेण्याचा प्रयत्न करु नका."