‘दंगल’ची लहानगी गीता अभिनयात अन् अभ्यासातही अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 05:19 PM2017-01-15T17:19:18+5:302017-01-15T17:19:18+5:30
आमिर खानच्या दंगल या चित्रपटात लहानग्या गीताच्या रुपात दिसणाºया जायरा वसीम हिने साकारलेली भूमिका चांगलीच प्रशंसा मिळवित आहे. दंगलमध्ये ...
आ िर खानच्या दंगल या चित्रपटात लहानग्या गीताच्या रुपात दिसणाºया जायरा वसीम हिने साकारलेली भूमिका चांगलीच प्रशंसा मिळवित आहे. दंगलमध्ये ती आपल्या सोबतच्या पहेलवान मुलांना धोबीपछाड करताना दिसते. जायरा केवळ आखाड्यातच यशस्वी ठरली नाही तर दहाव्या वर्गात असणाºया जायराने बोर्डाच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवित यश संपादन केले आहे. जायरा अभिनयाबरोबर अभ्यासातही हुषार आहे असेच म्हणावे लागेल.
जायरा वसीम जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगर येथील सेंट पॉल्स इंटरनेशनल अॅकेडमीची विद्यार्थिनी आहे. काश्मिरात नोव्हेंबर महिन्यात बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळी काश्मिरमध्ये बुरहान वानी याच्या इनकाऊंटरनंतर दहशतीचे वातावरण होते. अशा वातावरणात जायराने बोर्डाची परीक्षा ९० टक्के हून अधिक गुण मिळवित उत्तीर्ण केली आहे. गुरुवारी काश्मिर बोर्डाच्या परिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात १६ वर्षीय जायराने बाजी मारली आहे. या परिक्षांत ८१ टक्के मुली तर ८४ टक्के मुले पास झाली आहेत.
जायरा वसीमने दंगल या चित्रपटात लहानग्या गीता फोगटची भूमिका साकारली आहे. दंगलमध्ये जायरावर हानीकारक बापू व धाकड ही दोन गाणी बसविण्यात आली आहे. लहानग्या गीता व बबिता (सुहानी भटनागर) यांच्या भूमिका चांगल्याच पसंत करण्यात येत आहे. जायरा वसीम व सुहानी भटनागर यांचा फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.
जायरा लवकर आमिर खानच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, यात एक मुलगी आपला आवाज जगात पोहोचावा हे स्वप्न पाहत आहे. तिच्या आईचा देखील तिच्या या स्वप्नाला पाठिंबा असला तरी तिच्या वडिलांचा या सगळ्याला नकार असतो. तिला आपल्या स्वप्नांची जाणीव होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ती हिजाब घालून गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करते. यात आमिर खानची भूमिका चित्रपटातील तडका आहे, असे आमिरने सांगितले होते. ‘सिक्रेट सुपरस्टार’चे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले असून, आमिर आणि त्याची पत्नी किरण यांनी याची निर्मिती केली आहे.