आराध्या बच्चनचा १३ वा वाढदिवस, दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिसले अभिषेक-ऐश्वर्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 09:45 AM2024-12-02T09:45:45+5:302024-12-02T09:47:06+5:30
बर्थडे प्लॅनरने इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांसोबत व्हिडिओ शेअर केला आहे.
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यात काही दिवसांपासून बिनसल्याची चर्चा आहेच. शिवाय काही दिवसांपूर्वी आराध्याचा १३ वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी ऐश्वर्याने फक्त आराध्यासोबत फोटो शेअर केला होता. लेकीच्या बर्थडे पार्टीत अभिषेक बच्चन नव्हता अशीच चर्चा सगळीकडे झाली. मात्र आता बर्थडे प्लॅनरने इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. यावरुन अभिषेकही पार्टीत होता हे स्पष्ट झाले आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरुन आहे. अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे येत असल्याचं दिसत आहे. ऐश्वर्या कायम आराध्यासोबतच दिसते. नुकतंच अभिषेकचा 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमा रिलीज झाला. यावरही ऐश्वर्याने काही कमेंट केली नाही. तर काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने लेक आराध्याच्या बर्थडे पार्टीचा फोटो शेअर केला. यातही अभिषेक दिसला नाही. याचाच अर्थ तो लेकीच्या बर्थडे पार्टीला आलाच नाही अशी चर्चा झाली. पण आता अभिषेक पार्टीत होता हे समोर आले आहे. आराध्यासाठी बर्थडे इव्हेंट आयोजित करणाऱ्या दांम्पत्याने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. एकामध्ये ऐश्वर्या आराध्या आहेत ज्यात ऐश्वर्या त्यांचे आभार मानत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत फक्त अभिषेक आहे.
दरम्यान व्हिडिओ वेगवेगळे असल्याने अजूनही दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा तशी कायमच आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या दुबईत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिच्या नावातून बच्चन गायब असल्याचं दिसलं याचीही खूप चर्चा झाली. दरम्यान अद्याप दोघांनीही या चर्चांवर काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही.